‘देसी गर्ल’ प्रियंका अन् निकनं केला पँट न घालताच ‘खुल्लमखुल्ला’ डान्स ! (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडनंतर हॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवणारी अ‍ॅक्ट्रेस प्रियंका चोपडा सध्या चर्चेत आहे. प्रियंका चोपडा आणि पती निक जोनास ट्रेडिंग कपलपैकी एक आहेत. सध्या प्रियंका आणि निकचं एक व्हिडीओ साँग सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओत दोघेही पँट न घालताच फक्त शर्टवरच डान्स करताना दिसत आहेत. व्हिडीओत दोघांची केमिस्ट्री दिसत आहे.

व्हिडीओत दिसत आहे की, दोघांनही व्हाईट कलरच शर्ट घातला आहे. व्हिडीओत प्रियंका खूपच ग्लॅमरस आणि आकर्षक दिसत आहे. हे गाणं 1980 च्या व्हॉट ए मॅन गोटा डू या गाण्याचं दुसरं व्हर्जन आहे. गाण्यातील प्रियंका आणि निकच्या जोडीला चाहत्यांची मोठी पसंती मिळताना दिसत आहे. तर दुसरीकडे सोशलवर त्यांची खिल्ली उडवली जाताना दिसत आहे. एकानं तर त्यांना रिस्की बिजनेस कपल म्हटलं आहे. व्हिडीओबद्दल ट्विटरवर अनेक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर प्रियंका नुकतीच द स्काय इज पिंक या सिनेमात दिसली होती. अमेझॉनची सिरीज सिटाडेलमध्येही प्रियंका दिसणार आहे. प्रियंका सोबत बॉडीगार्ड फेम अ‍ॅक्टर रिचर्ड मॅडन देखील काम करताना दिसणार आहे.

https://twitter.com/NPglobaldomina/status/1218091756710961152