वऱ्हाड राजस्थानात दाखल ; “निक जोनसच्या लग्नाला प्रियांका नवरी नटली” 

जोधपूर : राजस्थान वृत्तसंस्था – बॉलिवूडची देशी गर्ल प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन गायक निक जोनस यांच्यात २ डिसेंबर रोजी विवाह संपन्न होणार आहे. हिंदू आणि  ख्रिश्चन पध्द्तीने हा विवाह संपन्न होणार असून या सोहळ्यासाठी चोप्रा आणि जोनस हि दोन्ही कुटुंब आज जोधपूर येथे दाखल झाले. निक प्रियंका यांना बघण्यासाठी जोधपूर विमानतळावर चाहत्यांची मोठी गर्दी उसळली होती.

१ डिसेंबरला एक लग्न
मागील काही दिवसात दीपिका आणि रणवीर यांच्यात सिंधी आणि कोकणी पद्धतीने विवाह पार पडले होते. त्याच प्रमाणे निक आणि प्रियांका यांचा हि विवाह दोन पध्द्तीने पार पडणार आहे. १ डिसेंबर रोजी प्रियांका आणि निक यांचा ख्रिश्चन पध्द्तीने विवाह संपन्न होणार आहे. हा विवाह विधी दुपारच्या जेवणापूर्वी पार पडणार आहेत.

२ डिसेंबरला दुसरे लग्न 
दुसऱ्या दिवशी म्हणजे दोन डिसेंबर रोजी  हिंदू पद्धतीने विवाह सोहळा संपन्न होणार आहे. हिंदू पद्धतीने होणाऱ्या विवाहाबद्दल सर्वत्र उत्सुकता लागली आहे. कारण  बॉलिवूडची देशी गर्ल लग्नाच्या शालूत कशी दिसणार हे बघण्यासाठी चाहते आतुर आहेत. ऑगस्ट महिन्यात निक आणि प्रियांका यांचा साखरपुडा पार पडला होता. प्रियांकाची त्या साखरपुड्यातील अंगठी १ कोटी ५० लाखाची आहे. तेव्हा हि साखरपुडा दोन पध्द्तीने पार पडला होता परंतु ख्रिश्चन पध्दतीचा साखरपुडा प्रियांका आणि निकने जाहीर केला नव्हता.

निक प्रियांका पेक्षा १० वर्षांनी लहान 
निक आणि प्रियांकाचे प्रेमाचे सुत हॉलिवूडच्या चित्रीकरणा दरम्यान जुळले असून त्या दोघांनी नंतर लग्न करण्याचा विचार केला. निक हा प्रियांका पेक्षा १० वर्षांनी लहान असून दोघांच्या फोटो वरून हि त्यांच्या वयाची तफावत स्पष्ट दिसते. या मागील काही दिवसापूर्वी निकने त्याला मधुमेह असल्याचे सोशल मीडियावर जाहीर केले होते त्यानंतर त्या पोस्टच्या कमेंट बॉक्स मध्ये प्रियानं कमेंट लिहली होती आणि त्यात लिहले होते कि काही का असेना पण  निक तू मला खूप आवडतो.

शाही पद्धतीने  होणार विवाह 
जोधपूर येथील हॉटेल उमेद भवन या ठिकणी निक आणि प्रियांका यांचा शाही विवाह पार पडणार असून ४ दिवसासाठी हे हॉटेल लग्नासाठी बुक करण्यात आले आहे. लग्नासाठी येणाऱ्या पाहुणासाठी हॉटेलच्या ६४ रुम २२ पॅलेस रूम बुक करण्यात आल्या असून त्यांच्या लग्नात परिधान करण्यात येणाऱ्या पोशाख बद्दल कसलीच माहिती माध्यमात देण्यात आली नाही परंतु त्यांचे पोशाख शाही असणार यात कोणती किंतु परंतु नाही. तसेच  निक प्रियांका यांच्या लग्नाला ४२ पध्द्तची स्वीट मागवण्यात आली आहेत.
एकंदरच प्रियांका आणि निकच्या लग्नाची चांगलीच धूम माजली असून या लग्नाचे ४ डिसेंबर रोजी दिल्लीत शाही रिशेप्शन पार्टी आयोजित करण्यात आली आहे.