टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टीवलची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून ‘देसी गर्ल’ प्रियंकाची निवड !

पोलीसनामा ओनलाईन – बॉलिवूड स्टार प्रियंका चोपडानं नुकतीच घोषणा केलीय की, तिला टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टीवल (टीआयएफएफ) 2020 ची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून निवडण्यात आलं आहे. सोबत तिला 50 प्रतिष्ठीत फिल्म निर्माता आणि अभिनेत्यांच्या यादीत समाविष्ट करण्यात आलं आहे ज्यांना टीआयएफएफच्या अ‍ॅम्बेसेडरच्या रुपात आमंत्रित करण्यात आलं आहे.

‘टीआयएफएफ माझ्यासाठी दूसरं घर’

प्रियंकानं तिच्या इंस्टावरून एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिनं लिहलं की, “माझ्या पूर्ण करिअरमध्ये टीआयएफएफ माझ्यासाठी दुसरं घर राहिलं आहे. टीआयएफएफ कायमच विविधता दाखवणाऱ्या वैश्विक सामग्रीचं समर्थन करत आलंय आणि चॅम्पियन बनवण्यासाठी सर्वात पुढं राहिलं आहे.” प्रियंका ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनल्याचा तिला अभिमान वाटत आहे आणि ती यासाठी खूप उत्सुक आहे असंही तिनं पोस्टमधून सांगितलं आहे.

कोरोनामुळं हा फिल्म फेस्टीवल डिजिटली स्क्रीन केला जाणार आहे. 10 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर पर्यंत हा फेस्टीवल चालणार आहे.

प्रियंकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ती व्हाईट टायगर सिनेमात दिसणार आहे. नेटफ्लिक्सवर रिलीज होणाऱ्या या सिनेमात तिच्यासोबत राजकुमार राव असेल. अशीही माहिती आहे की, पीसी(प्रियंका) संजय लीला भन्साळींच्या बैजू बावरा या आगामी सिनेमात रणवीर सिंगसोबत दिसणार आहे. याशिवाय ती अ‍ॅमेझॉन स्टुडिओजच्या शीला या सिनेमातही काम करणार आहे. या सिनेमात ती मां शीला आनंदची भूमिका साकारणार आहे. असंही म्हटलं जात आहे की, हॉलिवूडच्या मॅट्रीक्स 4 या सिनेमातही ती काम करण्याची शक्यता आहे.