BFC ची ब्रँड अ‍ॅम्बेसिडर बनताच ‘देसी गर्ल’ प्रियंकानं केलं Tweet ! म्हणाली…

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड स्टार प्रियंका चोपडा (Priyanka Chopra) आपल्या स्टाईल आणि फॅशनसाठी कायमच चर्चेत असते. तिचे अनेक आउटफिट्स आजवर चर्चेचा विषय ठरले आहेत. प्रियंका चोपडा सध्या पती निक जोनास (Nick Jonas) सोबत मॅरिड लाईफ एन्जॉय करत आहे. सध्या प्रियंका वेगळ्याच कारणामुळं चर्चेत आली आहे. प्रियंका ब्रिटिश फॅशन काउन्सिल (British Fashion Council – BFC) ची ब्रँड अ‍ॅम्बेसिडर बनली आहे. फॅशनच्या दुनियेत ती चांगलं काम करेल असं तिचं म्हणणं आहे. नुकतीच ट्विट करत तिनं याबाबत माहिती दिली आहे.

आपल्या ट्विटमध्ये तिनं लिहिलं की, पुढील वर्षी लंडनला राहणं आणि काम करण्याच्या दरम्यान पॉझिटिव्ह चेंजसाठी ब्रिटिस काउन्सिलची ब्रँड अ‍ॅम्बेसिडर बनून सन्मानित आहे. आमच्याकडे अनेक उत्तम उपक्रम आहेत जे लवकरच शेअर केले जातील. मला यात प्रवासात समाविष्ट करण्याची प्रतीक्षा आहे.

प्रियंकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ती व्हाइट टायगर सिनेमात दिसणार आहे. नेटफ्लिक्सवर रिलीज होणाऱ्या या सिनेमात तिच्यासोबत राजकुमार राव असेल. अशीही माहिती आहे की, पीसी (प्रियंका) संजय लीला भन्साळींच्या बैजू बावरा या आगामी सिनेमात रणवीर सिंगसोबत दिसणार आहे. याशिवाय ती अ‍ॅमेझॉन स्टुडिओजच्या शीला या सिनेमातही काम करणार आहे. या सिनेमात ती मां शीला आनंदची भूमिका साकारणार आहे. असंही म्हटलं जात आहे की, हॉलिवूडच्या मॅट्रीक्स 4 या सिनेमातही ती काम करण्याची शक्यता आहे. तिच्याकडे वी कॅन बी हिरोज (We Can Be Heroes) हा सिनेमाही आहे.

You might also like