…म्हणून ‘कोरोना’च्या काळात प्रियंका चोपडा घेतेय निकची विशेष काळजी ! ‘हा’ आजार त्याला कारणीभूत

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड स्टार प्रियंका चोपडा सध्या पती निक जोनास सोबत मॅरिड लाईफ एन्जॉय करत आहे. कोरोना महामारीच्या काळात ते एकमेकांची कळजी घेत आहेत. याला एक आजार कारणीभूत आहे. एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत प्रियंका म्हणाली होती की, आम्ही दोघं एकमेकांची खूप काळजी घेत आहोत. कारण निकला मधुमेह आणि मला अस्थमा आहे. त्यामुळं आम्ही कोणाशी संवाद साधताना खूप काळजी घेत आहोत.

लॉकडाऊनच्या काळात तिनं वर्क फ्रॉम होम केलं आहे. तिला घरातून काम करायला आवडतं असंही तिनं सांगितलं आहे. लॉकडाऊनमध्ये प्रियंकानं बायोग्राफीवर काम सुरू केलं होतं. या पुस्तकाचं नाव अनफिनिश्ड आहे. या पुस्तकात प्रियंकाच्या आयुष्याचा प्रवास चाहत्यांना पहायला मिळणार आहे. याच बायोग्राफीच्या अनुषंगानं प्रियंकानं अनेक जुन्या आठवणी ताज्या करत जुने फोटो आणि व्हिडीओ शेअर केले होते. बॉलिवूडची देसी गर्ल आज ग्लोबल स्टार म्हणून ओळखली जाते.

View this post on Instagram

My forever guy…so grateful for you @nickjonas

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on

प्रियंकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ती व्हाईट टायगर सिनेमात दिसणार आहे. नेटफ्लिक्सवर रिलीज होणाऱ्या या सिनेमात तिच्यासोबत राजकुमार राव असेल. अशीही माहिती आहे की, पीसी(प्रियंका) संजय लीला भन्साळींच्या बैजू बावरा या आगामी सिनेमात रणवीर सिंगसोबत दिसणार आहे. याशिवाय ती अॅमेझॉन स्टुडिओजच्या शीला या सिनेमातही काम करणार आहे. या सिनेमात ती मां शीला आनंदची भूमिका साकारणार आहे. असंही म्हटलं जात आहे की, हॉलिवूडच्या मॅट्रीक्स 4 या सिनेमातही ती काम करण्याची शक्यता आहे.

View this post on Instagram

When I met you in the summer… ☀️

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on

View this post on Instagram

Zoom meeting lewk! ✅😂

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on

View this post on Instagram

Expectation vs. Reality 📸- @divya_jyoti

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on

View this post on Instagram

Harper’s BAZAAR Singapore, March 2020

Tassel fun. #grammys

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on

You might also like