2 वेळा मोडल्यानंतर तिसर्‍या साखरपुडयाच्या तयारीत ‘देसी गर्ल’ प्रियंकाचा भाऊ ? गर्लफ्रेंडनं दिलं ‘असं’ उत्तर

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलिवूड स्टार प्रियंका चोपडाचा भाऊ सिद्धार्थ चोपडा पुन्हा एकदा आपल्या साखरपुड्याच्या बातम्यांमुळं चर्चेत आला आहे. साऊथ ॲक्ट्रेस नीलम उपाध्याय सोबतचा त्याचा फोटो घेऊन साखरपुड्याच्या बातम्या समोर येताना दिसत आहेत. या फोटोत नीलमनं अंगठी घातलेली दिसत आहे. फोटोतील तिची अंगठी पाहून लोक सिद्धार्थ आणि नीलमच्या एंगेजमेंटचे अंदाज लावताना दिसत आहेत.

समोर आलेल्या फोटोत नीलम आणि सिद्धार्थ एका इव्हेंटमध्ये दिसत आहेत. त्या दोघांशिवाय सिद्धार्थची आई मधु चोपडा देखील या इव्हेंटमध्ये दिसत आहे. नीलमनं मात्र यावर स्पष्टीकरण दिलं आहे. तिनं म्हटलं की, अंगठी तिच्या उजव्या हातात आहे. अद्याप साखरपुडा झालेला नाही. तिच्या स्पष्टीकरणानंतरही लोक हे मानायला तयार नाहीत असं दिसत आहे.

काहींनी तर फोटोवर कमेंट करत सिद्धार्थची मजाही घेतली आहे. एकानं लिहिलं आहे की, “याच्या किती मंगेतर आहेत.” एकानं लिहिलं, लोकं डेटवर जातात हे एंगेजमेंटवर जातात.

सिद्धार्थचा पहिला साखरपुडा आपली लाँग टाईम गर्लफ्रेंड कनिका माथुरसोबत 2014 साली झाली होती. 2015 साली त्यांचं लग्न ठरलं होतं. परंतु साखरपुड्याच्या एका महिन्यानंतर डिसेंबरमध्ये सिद्धार्थनं साखरपुडा मोडला. यानंतर पाच वर्षांनी 2019 मध्ये सिद्धार्थचा इशिता कुमार सोबत साखरपुडा झाला. परंतु लग्नाआधीच हे नातंही तुटलं.

https://www.instagram.com/p/Bzz82s0F3tR/