प्रियंका चोप्राच्या बहिणीच्या जेवणात निघाले ‘किडे’, पंचतारांकित हॉटेलमधील धक्कादायक प्रकार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या बहिणीने आपल्याला अहमदाबादमध्ये किडे असलेलं खान देण्यात आल्याच्या आरोपावरून एका फाईव्ह स्टार हॉटेलला चांगलेच धारेवर धरले आहे. मीरा चोप्रा ने सांगितले की, अहमदाबादमधील एका हॉटेलमध्ये तिला किडे असलेले खाद्य पदार्थ वाढण्यात आले.

मीरा ने सांगितले की, गेल्या आठवड्याभरापासून ती अहमदाबादच्या एका फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये राहत आहे. मात्र एका दिवशी तिला किडे असलेले खाद्य पदार्थ देण्यात आले. याबाबत एक ट्विट तिने केले आहे. आपण एखाद्या हॉटेल मध्ये सर्व काही चांगलं मिळावं म्हणून राहतो आणि महागड्या हॉटेलला पैसे देतो. मात्र मी या हॉटेलमध्ये आल्यापासून आजारी पडली आहे.

मीरा चे हे ट्विट पाहून फूड सेफ्टी एंड स्टैंडर्ड अथॉरिटी ऑफ इंडिया (FSSAI) ने तिला रिट्विट करून म्हंटले आहे की, यावर आम्ही कारवाई सुरु केली आहे, आम्हाला थोडा वेळ द्या .

मीरा ने सोशल मीडियावर टाकलेला हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे आणि सर्वसामान्यांच्या मनात फाईव्ह स्टार हॉटेल बद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. तर उच्च स्तरीय लोक अशा महागड्या हॉटेलमध्ये राहायचे की नाही यावर विचार करू लागले आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like