‘देसी गर्ल’ प्रियंकानं शेअर केला वडिल अशोक चोपडांचा फोटो ! म्हणाली…

पोलीसनामा ऑनलाईन टीम : अभिनेत्री प्रियंका चोपडा तिचे वडिल दिवंगत अशोक चोपडा यांच्या खूप क्लोज होती. वडिलांच्या आठवणीतच तिनं मनगटावर डॅडीज लिटील गर्लचा टॅटू बनवला आहे. भारतासाठी मिस वर्ल्डचा किताब जिंकणारी आणि बॉलिवू़ड ते हॉलिवूडचा प्रवास करणारी प्रियंका आज एक फॅशन आयकॉन आहे. प्रियंकानं वडिलांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं त्यांची आठवण काढली आहे. सोशलवर तिनं एक पोस्ट शेअर केली आहे. प्रियंकाचे वडिल अशोक चोपडा यांचं 10 जून 2013 रोजी निधन झालं आहे.

https://www.instagram.com/p/CBQQbeVBrU0/

प्रियंकानं तिच्या इंस्टावरून एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो तिचे वडिल अशोक चोपडा यांचा आहे. यात ते खूपच यंग दिसत आहे. फोटो शेअर करताना तिनं खास कॅप्शनही दिलं आहे. कॅप्शनमध्ये प्रियंका म्हणते, “हृदयाच्या दोरीच्या माध्यमातून आपण अनंतापर्यंत जोडून आहोत. मिस यु डॅड. रोज.”

प्रियंकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ती व्हाईट टायगर सिनेमात दिसणार आहे. नेटफ्लिक्सवर रिलीज होणाऱ्या या सिनेमात तिच्यासोबत राजकुमार राव असेल. अशीही माहिती आहे की, पीसी(प्रियंका) संजय लीला भन्साळींच्या बैजू बावरा या आगामी सिनेमात रणवीर सिंगसोबत दिसणार आहे. याशिवाय ती अ‍ॅमेझॉन स्टुडिओजच्या शीला या सिनेमातही काम करणार आहे. या सिनेमात ती मां शीला आनंदची भूमिका साकारणार आहे. असंही म्हटलं जात आहे की, हॉलिवूडच्या मॅट्रीक्स 4 या सिनेमातही ती काम करण्याची शक्यता आहे.

https://www.instagram.com/p/CBDULyhDzkE/

https://www.instagram.com/p/CBDUPPtjFgM/

https://www.instagram.com/p/CAt2bksh6rf/

https://www.instagram.com/p/CAt2gxqBfwb/

https://www.instagram.com/p/CAFrUIUDBf7/

https://www.instagram.com/p/B_kFzOpBHgl/

https://www.instagram.com/p/B_w4d8gBw6f/

https://www.instagram.com/p/B-mP_6DjwWF/

https://www.instagram.com/p/B-MN5ARJ2NZ/

https://www.instagram.com/p/B-JGkAcJ5bv/

https://www.instagram.com/p/B-HPylkJPBt/