प्रियांका चोप्राचे होणारे सासरे कर्जात बुडालेले 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन
अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन सिंगर निक जोनास यांच्या साखरपुड्यानंतर तिच्या फॅन्सना आता तिच्या लग्नची आतुरता लागून राहिली आहे . याच दरम्यान प्रियांकाच्या होणाऱ्या सासऱ्यांसंबधी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, निकचे वडील आणि प्रियांकाचे होणारे पॉल जोनास यांच्या एका रियल इस्टेट कंपनी वर  १० लाख डॉलरहून अधिक रकमेचं कर्ज आहे. यामध्ये त्यांची कंपनी केस हरल्या प्रकरणाच्या २. ६८  लाख डॉलर्सचाही समावेश आहे. पॉल जोनस यांच्या कंपनीने स्वतःला दिवाळखोर म्हणून घोषित केलं आहे . यादरम्यान, पॉल जोनस आपल्या मालमत्तेतील काही मालमत्तेचा विक्री करण्याचाही विचार करत असल्याची माहिती समोर आली आहे.
[amazon_link asins=’B01FXJI1OY,B008V6T1IW’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b043164d-af49-11e8-9022-6b8f9115a509′]

प्रियांका चोप्राच्या रोका विधिसाठी पॉल जोनस पत्नी डेनिस जोनससहीत भारतात आले होते. प्रियंका आणि निकचा साखरपुडा झाला आला असला तरीही प्रियांका-निकच्या लग्नाच्या तारखेबाबत अद्यापपर्यंत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
कन्हैय्या कुमार बिहारमधून लढणार २०१९ ची लोकसभा निवडणूक!