‘लॉकडाऊन’मध्ये तब्बल 2 महिन्यांनी घराबाहेर पडली प्रियंका चोपडा ! फोटो शेअर करत म्हणते…

पोलिसनामा ऑनलाइन –देशात तिसऱ्यांदा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. अशात अनेक सेलेब्स घरातच बंद आहे. काही कलाकार एका महिन्यानं तर काही दोन महिन्यांनी घरातून बाहेर पडले आहे. बॉलिवूड स्टार प्रियंका चोपडाही दोन महिन्यांनी घरातून बाहेर पडली आहे.

प्रियंकानं तिच्या इंस्टावरून एक फोटो शेअर केला आहे. या पोस्टमधून तिनं सांगितलं आहे की, जवळपासून 2 महिन्यांनी ती घरातू बाहेर पडली आहे. प्रियंकानं तिचा एक क्लोजअप सेल्फी शेअर केला आहे. फोटोत दिसत आहे की, तिनं मास्कही लावलं आहे. फोटो शेअर करताना प्रियंकानं लिहिलं की, “डोळे कधीच शांत नसतात. दोन महिन्यांन पहिल्यांदा घरातून बाहेर पडले आहे.” प्रियंकाचा हा फोटो सर्वांना आवडला असून सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

प्रियंकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ती व्हाईट टायगर सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत राजकुमार राव असेल. अशीही माहिती आहे की, पीसी(प्रियंका) संजय लीला भन्साळींच्या बैजू बावरा या आगामी सिनेमात रणवीर सिंगसोबत दिसणार आहे. याशिवाय ती अॅमेझॉन स्टुडिओजच्या शीला या सिनेमातही काम करणार आहे. या सिनेमात ती मां शीला आनंदची भूमिका साकारणार आहे. असंही म्हटलं जात आहे की, हॉलिवूडच्या मॅट्रीक्स 4 या सिनेमातही ती काम करण्याची शक्यता आहे.

https://www.instagram.com/p/B8X6r8Op0yp/