‘व्हायरल’ होत होती निक जोनसची ‘सिंगल’ फोटो, प्रियंका चोप्रानं ‘एडिट’ केलं आणि पुढे झालं ‘असं’ काही !

नवी दिल्ली वृत्तसंस्था – प्रियंका चोप्रा आणि निक जोनस बॉलिवूडमध्येच नव्हे तर हॉलिवूडच्या सर्वात भारी कपल्समध्ये सामील झाले आहेत. प्रियंका आणि निकची रोमँटिक छायाचित्रे सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत असतात. दोघांमधील बॉन्डिंग आणि केमिस्ट्री जबरदस्त आहे.

प्रियांका आणि निक सावलीप्रमाणे एकमेकांसोबत राहतात. मात्र, अलीकडेच प्रियंका पती निकसोबत एका अ‍वॉर्ड फंक्शनमध्ये दिसली नव्हती. या फंक्शनमध्ये जोनस ब्रदर्स यांना त्यांच्या ‘सकर’ या नवीन पॉप गाण्यासाठी पुरस्कार मिळाला.

निक जोनस हे त्याचे बंधू जो जोनस आणि केविन जोनससमवेत या पुरस्कार सोहळ्यास पोहोचले. दोघांच्या बायकासुद्धा आपल्या पतीच्या समर्थनार्थ आल्या होत्या. पुरस्कार सोहळ्याची घोषणा होताच जोची पत्नी सोफी टर्नर आणि केव्हिनची पत्नी डॅनियल यांनी त्यांच्या पतींचे चुंबन घेतले. पण प्रियांकाच्या अनुपस्थितीमुळे निक एकटाच उभा राहिला.

या घटनेचे निक एकटा उभा असल्याचे चित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले. कदाचित प्रियांकाला निक ला असं एकटं पाहणं आवडलं नसेल. अशा परिस्थितीत निकच्या व्हायरल चित्रात प्रियंकाने फोटोशॉपच्या माध्यमातून स्वत: ला फिट केले. प्रियंकाने तिचे एडिट केलेले चित्र निकसोबत सोशल मीडियावरही शेअर केले आहे.

फोटोमध्ये प्रियंका निकला मिठी मारताना दिसत आहे. निक बरोबर तिचा एडिट केलेला फोटो शेअर करताना प्रियंकाने “मी सदैव तुझ्याबरोबर आहे” असे कॅप्शन लिहिल आहे.

प्रियांका सध्या तिच्या अनेक हॉलिवूडच्या प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे त्यामुळे कामातून वेळ काढून ती आपल्या पतीला वेळ देण्याचा प्रयत्न करते मात्र प्रियंकाने सोशल मीडियावर टाकलेला हा फोटो जोरदार पद्धतीने व्हायरल होत आहे.

 

आरोग्यविषयक वृत्त –