आहो ऐकलं का ! अभिनेत्री प्रियंका चोप्रा गुडन्यूज देणार ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा आपल्या अभिनयाने सगळ्यांनाच घायाळ करत असते. नुकतिच प्रियंका लग्नाच्या बेडीत अडकली आहे. तिने अमेरिकन सिंगर निक जोनाससोबत लग्न केले आहे. तिच्या लग्नाचे फोटो सोशल मिडियावर खूप व्हायरल झाले होते. प्रियंका सोशल मिडियावर नेहमीच वेगवेगळे फोटो शेअर करत असते. नुकतिच तिची एक गोष्ट सगळीकडे पसरत आहे. ती म्हणजे तिच्या प्रेग्नेसींची. प्रियंका प्रेग्नेंट असल्याचे सगळीकडे पसरत आहे. याआधी देखील तिच्या एका फोटोमुळे ती प्रेग्नेंट असल्याची बातमी सगळीकडे पसरली होती.

यानंतर प्रियंका आपली आई मधु चोप्रासोबत मुंबईमध्ये एका हॉस्पिटलच्या बाहेर स्पॉट झाली. यांतर पुन्हा तिच्या प्रेग्नेंसीच्या चर्चांना उधाण आले. शेवटी तिच्या आईने या सर्व गोष्टी अफवा असल्याचे सांगितले. तरी देखील प्रियंकाबद्दलच्या चर्चा संपत नाहीत.

नुकतेच प्रसिद्ध एस्ट्रो न्युमरोलॉजिस्ट संजय बी जुमानी यांनी प्रियंकाबद्दल एक भविष्यवाणी केली होती की, येत्या २४ महिन्यात प्रियंका आई होणार आहे. जुमानी यांनी याआधी देखील प्रियंकाच्या लग्नाची भविष्यवाणी केली होती आणि ती खरी देखील ठरली होती.

संयज बी जुमानी यांच्या मते, प्रियंकासाठी ९ नंबर सगळ्यात लकी आहे. तिची बर्थडे ची तारीख सुद्धा १८.७.१९८२ आहे. यानुसार तिच्या जन्मतारीखेची बेरीज ९ येते. सध्या प्रियंकाचे वय ३६ वर्षापेक्षा जास्त असून ३+६ याची बेरीज ९ येते. प्रियंका १८ व्या वर्षी मिस वर्ल्ड झाली होती याची देखील बेरीज ९ येते. तिचा चित्रपट फॅशन आणि दोस्ताना सुद्धा तिच्या वयाच्या २७ वर्षी प्रदर्शित झाला होता. या वयाची बेरीज सुद्धी २+७ = ९ होते. त्याचबरोबर तिचे लग्नसुद्धा ३६ वर्षात झाले. यावरुन स्पष्ट दिसून येते की, प्रियंकासाठी ९ नंबर किती लकी आहे.

https://www.instagram.com/p/BvNnGlMH_–/

 

आरोग्यविषयक वृत्त