… म्हणून ‘त्या’वेळी माकडीनीने प्रियंका चोपडाच्या ‘कान’पुर्‍यात वाजवली

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अनेकदा बॉलिवूड स्टारसोबत असे काही घडते जे त्यांना सहन होत नाही आणि त्यांना समजतही नाही. आजकाल अनेक स्टार्स त्यांच्या लहानपणीचे काही विनोदी किस्से चाहत्यांसोबत शेअर करताना दिसत आहे. स्टार्सबद्दल अनेक गुपितं जाणून घेण्यासाठी चाहतेही नेहमीच उत्सुक असतात. असाच एक कॉमेडी किस्सा प्रियंका चोपडाने सांगितला होता. 2017 मध्ये कपिल शर्मा शोमध्ये तिने हा किस्सा शेअर केला होता. देसी गर्ल सांगते की, लहानपणी तिला एका माकडीनीने कानशिलात लगावली होती. नुकतंच तिने याबाबत सांगितलं आहे.

प्रियंका चोपडा म्हणते की, “मी लखनऊमध्ये इयत्ता तिसरीमध्ये होते. आमच्या शाळेत एक झाड होते. तेथे खूप सारे माकडं होते. एक माकडीन झाडावर उभी राहून काहीतरी करत होती. बहुतेक ती स्वत:ला साफ करत असावी. परंतु मला हे सगळं खूप विनोदी वाटलं. मी उभी होते आणि तिच्यावर जोरात हसत होते. मी हसताना असेही म्हणत होते की, बघा ती माकडीन कशी स्वत:लाच साफ करत आहे. यानंतर ती माकडीन खाली आली आणि तिने माझ्या कानशिलात लगावली.” प्रियंकाने हा किस्सा सांगिल्यानंतर शोमध्ये उपस्थित सर्वच हसायला लागले.

प्रियंका चोपडाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, प्रियंका द स्काय इज पिंक या सिनेमातून कमबॅक करत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, या सिनेमात प्रियंका चोपडासोबत फरहान अख्तर आणि जायरा वसीम प्रमुख भूमिकेत असणार आहेत. हा सिनेमा सोनाली बोस दिग्दर्शित असून ऑक्टोबरमध्ये हा सिनेमा रिलीज होणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त

हाताला ६ बोटे असणे असते फायद्याचे

प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी ‘गुगल मॅप्स’ आणणार नवीन ‘अ‍ॅप’

कॅन्सरच्या मोठ्या सामन्यानंतर सोनाली घेतेय आता हा ‘उपचार’

कोल्हापूरचं हृद्य धडधडतंय पुण्यात

 

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like