जेव्हा 20 वर्षांपूर्वी प्रियंकाच्या डोक्यावर होता ‘मिस वर्ल्ड’ चा क्राऊन, बदललं पूर्ण आयुष्य

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – जमशेदपूरसारख्या लहान शहरातून येऊन आपल्या करिअरला सुरुवात करणाऱ्या प्रियंका चोपडाची आज जगात ओळख. प्रियंका आज वर्ल्ड स्टार बनली आहे. प्रियंकानं आपल्या आयुष्यात खूप काही कमावलं आहे. आजच्या दिवशीच प्रियंकानं मिस वर्ल्डचा क्राऊन घातला होता. 20 वर्षांपूर्वीच्या त्या क्षणांची आठवण काढत प्रियंकानं सोशलवरून एक पोस्ट शेअर केली आहे.

फोटोत दिसत आहे की, प्रियंकानं मिस वर्ल्डचा क्राऊन घातला आहे. कॅप्शनमध्ये प्रियंका म्हणते, “18 व्या वर्षी मिस वर्ल्ड… सगळं जग बदलून गेलं… वर्ष होतं 2000. कमाल आहे. असं वाटतंय जसं काही कालचीच गोष्ट आहे जी मी स्वप्नात अनुभवत आहे. आता तब्बल 20 वर्षांनंतरही परिस्थिती बदलण्याचा माझ्यात तेवढाच आणि मजबूत उत्साह आहे. आणि हा उत्साह अधिकच असतो जेव्हा मी काही करत असते.”

प्रियंका चोपडाचे वडिल दिवंगत अशोक चोपडा आणि आई मधु चोपडा सैन्यात कार्यरत होते. प्रियंकानं सुरुवातीचं शिक्षण भारतात घेतलं. हायर एज्युकेशनसाठी ती अमेरिकेत गेली होती.

प्रियंकानं शाळेत अनेक ब्युटी कॉन्टेस्ट जिंकल्या होत्या. यामुळेच तिला मिस वर्ल्डला उतरण्याची हिंमत मिळाली. तिच्या आई-वडिलांनी कायमच तिला सपोर्ट केला आहे. ब्युटी कॉन्टेस्ट असो वा बॉलिवूड पार्टीज प्रियंकाचे वडिल तिचा हात धरून तिला प्रत्येक वातावरणात कॉन्फिडन्सने नेत असत. ती तिच्या वडिलांच्या खूप क्लोज होती.

View this post on Instagram

This guy. #Grammys2020

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on

प्रियंकाला 30 नोव्हेंबर 2000 साली लंडनच्या मिलेनियम डोममध्ये मिस वर्ल्ड 2000 आणि मिस वर्ल्ड कॉन्टिनेंटल क्वीन ऑफ ब्युटी एशिया अँड ओशिनियाचा ताज घालण्यात आला होता.

View this post on Instagram

#GoldenGlobes2020 💗 @nickjonas

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on

मिस वर्ल्डचा किताब जिंकल्यानंतर प्रियंकानं हळूहळू हिंदी सिनेमात एन्ट्री केली. हमराज सिनेमातून ती डेब्यू करणार होती. परंतु काही कारणामुळं ती या सिनेमाचा भाग होऊ शकली नाही. यानंतर तिनं थमिजहन या तमिळ सिनेमातून अभिनयाला सुरुवात केली.

द हिरो लव स्टोरी ऑफ स्पाय या सिनेमातून तिनं हिंदी सिनेमात एन्ट्री केली. आज हॉलिवूड स्टार निक जोनास सोबत लग्न केल्यानंतर प्रियंका सेटल झाली आहे. ती आपाल जास्तीत जास्त वेळ अमेरिकेतच घालवत असते.

You might also like