काय सांगता ! अभिनेत्री प्रियंका चोप्रा, तिचा पती निक ‘चक्‍क’ शेती करणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि निक जोनस कधीच लाइमलाइटपासून लांब नसतात. यांचे स्टारडम आणि लव लाइफ चालूच राहते. नुकत्याच एका मुलाखतीत निक जोनसने फार्म लाईफवर आपले प्रेम व्यक्त केले आहे. निक जोनस फार्म लाइफसाठी आपले स्टारडमही सोडू शकतो.

मुलाखतीत बोलताना निकने याचा खुलासा केला की, शेतीकडे जाण्याचा विचार अजूनही त्याच्या डोक्यात आहे. निकने प्रियंका चोप्रासोबत लग्न केल्यानंतरही शेतीचा विचार सोडला नाही.
एवढेच नव्हे तर निक जोनसने सांगितले की, प्रियंकाला ही आयडिया आवडली आहे.

याबाबत बोलताना निक जोनसने याचा स्विकार केला की, शेतीकडे गेल्यावर प्रियंकाच्या आयुष्यामध्ये खूप बदल होतील कारण प्रियंकाही बॉलिवूडची प्रसिद्ध आणि यशस्वी सुपस्टार आहे. एवढेच नाही तर प्रियंकासाठी स्टारडम सोडून फार्म लाइफला स्विकार करणे खूपच अवघड आहे.

निकने खऱ्या जीनवसाथीची निवड केली जी त्याला नेहमीच साथ देईल म्हणून तो स्वतःला लकी समजतो.