प्रियांकाची बॉलिवूड साठी रिसेप्शन पार्टी, या सेलिब्रेटींनी घेतली ‘शॉकिंग एन्ट्री’ !

मुंबई : वृत्तसंस्था – प्रियंकाने अमेरिकन गायक निक जोनास याच्याशी १ डिसेंबर ला उमेद भवन येथे लग्न केले होते हे लग्न अनेक कारणाने चर्चेत होते. काही दिवसापूर्वी या रिसेप्शनचे वेडिंग कार्ड  इंटरनेट वर व्हायरल झाले होते . प्रियांका दोन रिसेप्शन देणार होती  पहिले १९ डिसेंबरचे रिसेप्शन फॅमिलीसाठी तर २०डिसेंबरला बॉलिवूडसाठी. त्याप्रमाणे प्रियांका -निक यांच्या लग्नाची  रिसेप्शन पार्टी मुंबई येथे काल पार पडली या पार्टीत बॉलिवूड मधील अनेक कलाकारांनी म्हणजेच  रणवीर सिंग, दीपिका पादुकोण, काजोल, जान्हवी कपूर अशा सगळ्यांनी या पार्टीत हजेरी लावली

या तिघांची ‘शॉकिंग एंट्री’

भारत चित्रपट साइन केल्यानंतर प्रियंकाने अचानक या चित्र पाटातून आपले नाव काढून भेटले होते . त्यामुळे सलमान तिच्यावर नाराज झाला असल्याचे वृत्त होते . त्यामुळे प्रियांकाच्या रिसेप्शनमध्ये तो येईल, याची खात्री नव्हती. पण सलमान आला आणि त्याची एन्ट्री ही  ‘शॉकिंग एन्ट्री’ ठरली.

दुसरी  ‘शॉकिंग एन्ट्री’  ही प्रियांकाचा एक्स बॉयफ्रेंड हरमन बावेजा याची होती. प्रियांका आणि हरमन हे काही वर्ष रिलेशनशिप  मध्ये होते  ‘लव स्टोरी 2050’ आणि ‘व्हाट्स योर राशी’ या चित्रपटात दोघांनीही एकत्र काम केले होते. काही दिवसांनी यांचे ब्रेकअप झाले.

आणि यातील तिसरी  ‘शॉकिंग एन्ट्री’ ही शाहीद कपूर याची ठरली या पार्टी मध्ये शहीद याने पत्नी मीरा सोबत हजेरी लावली होती. हरमन बावेजाशी ब्रेकअप झाल्या नंतर प्रियांका काही वर्ष शाहीद सोबत रिलेशनशिप मध्ये होती .