‘प्रियंका-निक’ जोनासनं केला ‘लडकी आंख मारे’ गाण्यावर डान्स, रणवीरनं केली ‘अशी’ कमेंट (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोपडा आणि निक जोनास अनेकदा आपल्या फोटो किंवा व्हिडीओमुळे नेहमीच चर्चेत असतात. नुकताच प्रियंका चोपडानं एक व्हिडीओ सोशलवर शेअर केला आहे ज्यामुळे दोघंही पुन्हा चर्चेत आले आहेत. हा एक फनी व्हिडीओ आहे म्हटलं तरीही चालू शकतं.

View this post on Instagram

#GoldenGlobes2020 💗 @nickjonas

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on

रणवीरच्या सिंबा सिनेमातील त्याचं आणि सारा अली खानचं वो लडकी आंख मारे हे गाणं खूपच गाजलं. प्रियंका चोपडा आणि निक जोनास याच गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. खास बात अशी की, रणवीर सिंगनंही या व्हिडीओवर कमेंट केली आहे. फुलं पॉवर असं त्यानं आपल्या कमेंटमध्ये म्हटलं आहे. निक हॉलिवूड सिंगर असला तरीही त्याचं बॉलिवूड सिनेमा आणि गाण्यांवर विशेष प्रेम आहे. या व्हिडीओतदेखील त्याचा कॉमेडी अंदाजात डान्स दिसत आहे. सध्या हा व्हिडीओ सोशलवर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. प्रियंकादेखील हसत हसत डान्सचा आनंद घेताना दिसत आहे. कारण निक अनेक ठिकाणी फनी स्टेप करताना दिसत आहे. मध्येच तो प्रियंकाच्या स्टेप फॉलो करताना दिसतो.

चाहत्यांनाही निकचा हा फनी डान्स प्रचंड आवडला आहे असं दिसत आहे. कारण निक आणि प्रियंकाच्या अनेक चाहत्यांनी या व्हिडीओवर कमेंट करत त्यांच्या डान्सचं कौतुक केलं आहे. काहींनी निकला डान्ससाठी कॉम्प्लीमेंट दिली आहे.

View this post on Instagram

My Valentine. ♥️

A post shared by Nick Jonas (@nickjonas) on

You might also like