‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्राला आहे ‘हा’ आजार

मुंबई: वृत्तसंस्था

अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिला कॅन्सर झाला असून तिच्यावर अमेरिकेत उपचार सुरू असतानाच आता बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा हिला दम्याचा आजार असल्याची माहिती समोर आली आहे. ‘मला दम्याचा आजार आहे, यात लपवण्यासारखं काय आहे’?, असं म्हणत स्वतः प्रियांका चोप्रा हिनंच हा आजार असल्याची माहिती सोशल मीडियावरुन दिली आहे.

[amazon_link asins=’B0756Z53JN’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’825c1002-bb1c-11e8-b373-119ff2c386e8′]

सोशल मीडियावरील इन्स्टाग्राम आणि ट्विटरवरुन ‘हॉट आणि क्यूट’ फोटो शेअर करणाऱ्या प्रियांकानं स्वतःच्या ट्विटरवरुन दमा असल्याची माहिती शेअर केली आहे. प्रियांकाने माहिती दिल्यानंतर तिच्या असंख्य चाहत्यांना धक्का बसला आहे. या आजाराची माहिती देण्यासोबतच यात लपवण्यासारखं काय आहे?, असंही तिनं म्हटलं आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुपवर संरक्षणमंत्र्यांच्या हत्येची चॅटिंग 

मला चांगलं माहिती आहे की, हा आजार कसा नियंत्रणात आणायचा. मला दमा असला तरी तो कधीच माझ्या आयुष्यातील लक्ष्य गाठण्यासाठी आडकाठी ठरू शकत नाही किंबहूना मला रोखू शकत नाही, असं तिनं ट्विटरवरुन म्हटलं आहे.