Video : ‘ऐतराज’ सिनेमाबद्दल 16 वर्षांनी ‘देसी गर्ल’ प्रियंकाचा मोठा खुलासा, म्हणाली – ‘तेव्हा मी नवीन होते अन्…’

पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार प्रियंका चोपडा (Priyanka Chopra) आपल्या स्टाईल आणि फॅशनसाठी कायमच चर्चेत असते. तिचे अनेक आऊफिट्स आजवर चर्चेचा विषय ठरले आहेत. प्रियंका चोपडा सध्या पती निक जोनास (Nick Jonas) सोबत मॅरिड लाईफ एन्जॉय करत आहे. तिनं बॉलिवूडमध्ये व्हिलनचं कामही केलं आहे. तिची बोल्ड भूमिका असणारा असाच एक सिनेमा आहे. ऐतराज (Aitraaz) असं या सिनेमाचं नाव आहे. आज या सिनेमाला 16 वर्षे पूर्ण झाली आहेत. प्रियंकानं या निमित्तानं सिनेमाशी संबंधित मोठा खुलासा केला आहे.

प्रियंकानं तिच्या इंस्टावरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात तिच्या काही क्लिपिंग पहायला मिळत आहेत. व्हिडीओ शेअर करताना प्रियंकानं खास कॅप्शनही दिलं आहे. कॅप्शनमध्ये तिनं लिहिलं की, 2004, एक अ‍ॅक्टर म्हणून एक वर्ष, मी अब्बास मस्तान यांच्या ऐतराज या थ्रिलर सिनेमात सोनियाची भूमिका साकारली होती. मी साकारलेल्या भूमिकांपैकी ही खूप बोल्ड भूमिका होती. ही एक मोठी रिस्क देखील होती. कारण मी तेव्हा इंडस्ट्रीत नवीन होते. मला हे सांगायचं आहे की, मी तेव्हा खूप घाबरले होते.

प्रियंका पुढं म्हणाली, मी कायम अब्बास मस्तान यांची आभारी राहिल की, त्यांनी माझ्या सारख्या न्यू कमरला असा रोल देऊन माझ्यावर विश्वास दाखवला. माझ्या आतला कलाकार त्यांनी ओळखला आणि माझं टॅलेंट समजून घेतलं. मला त्यांनी खूप प्रेरीत केलं. आज मला याचा अभिमान आहे की, जेव्हा 16 वर्षांनंतर मी मागे वळून पाहते तेव्हा ऐतराज माझ्यासाठी गेमचेंजर होता ज्यानं मला पूर्ण निष्ठेनं कोणतीही भूमिका साकरणं शिकवलं.

प्रियंकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ती व्हाईट टायगर सिनेमात दिसणार आहे. नेटफ्लिक्सवर रिलीज होणाऱ्या या सिनेमात तिच्यासोबत राजकुमार राव असेल. अशीही माहिती आहे की, पीसी(प्रियंका) संजय लीला भन्साळींच्या बैजू बावरा या आगामी सिनेमात रणवीर सिंगसोबत दिसणार आहे. याशिवाय ती अ‍ॅमेझॉन स्टुडिओजच्या शीला या सिनेमातही काम करणार आहे. या सिनेमात ती मां शीला आनंदची भूमिका साकारणार आहे. असंही म्हटलं जात आहे की, हॉलिवूडच्या मॅट्रीक्स 4 या सिनेमातही ती काम करण्याची शक्यता आहे.