Priyanka Chopra | सरोगसीद्वारे आई झाल्याने होणाऱ्या टीकेला प्रियांका चोप्राने दिले सडेतोड उत्तर

पोलीसनामा ऑनलाईन टीम : बॉलीवूड आणि हॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राने (Priyanka Chopra) 2018 साली अमेरिकन गायक निक जोनासशी लग्न केलं होतं. निक तिच्यापेक्षा १० वर्षांनी लहान आहे, त्यामुळे त्यांच्यातील वयातील अंतरामुळे प्रियांका चोप्राला कायम ट्रोल केलं जातं. जानेवारी 2022 मध्ये प्रियांका-निक एका मुलीचे पालक झाले आहेत. त्यांनी सरोगसीद्वारे त्यांची मुलगी मालती मेरीचं स्वागत केलं होतं. पण त्यावरून प्रियांकावर (Priyanka Chopra) लोकांनी खूप टीका केली गेली होती.
प्रियांकाने अलीकडेच पती निक जोनासचं वय आणि सरोगसीद्वारे आई झाल्याने होणाऱ्या टीकेला उत्तर दिलं. ‘ब्रिटीश वोग’ या मॅगझीन शी बोलताना ती म्हणाली, “निक जरी माझ्यापेक्षा 10 वर्षांनी लहान असला तरी तो त्याच्या वयापेक्षा जास्त समजदार आहे. तो मला आयुष्यात स्थिर राहण्यास मदत करतो आणि मला माझ्या मुल्यांची वारंवार आठवण करून देतो.”
सरोगसीद्वारे आई होण्यावरून प्रियांकावर खूप टीका झाली. त्याबद्दलही तिने भाष्य केलं.
“काही वैद्यकीय कारणांमुळे मी आई होऊ शकत नव्हते.
त्यामुळे आमच्याजवळ सरोगसी हाच बाळासाठी पर्याय होता.
हा माझ्या आयुष्यातील एक अतिशय महत्त्वाचा टप्पा होता.
मी खूप भाग्यवान समजते की मला सरोगसीद्वारे आई होता आलं.
मी माझ्या सरोगेटची देखील आभारी आहे, तिने आमच्या बाळाची सहा महिने काळजी घेतली,” असं प्रियांका म्हणाली.
आपल्या मुलीबद्दल बोलताना प्रियांका (Priyanka Chopra) म्हणाली, “जेव्हा लोक माझ्याबद्दल काही बोलतात, तेव्हा मी स्वतःला जास्त खंबीर बनवते. पण जेव्हा लोक माझ्या मुलीबद्दल नकारात्मक बोलतात तेव्हा मला खूप त्रास होतो. माझ्या मुलीला तरी या सगळ्यांपासून दूर ठेवा. मालतीचा जन्म झाला तेव्हा ती ऑपरेटिंग रूममध्ये होती. तेव्हा ती वाचणार कि नाही हि भीती माझ्या मनात होती. ती माझ्या हाताच्या तळव्यांपेक्षाही लहान होती.
अतिदक्षता वॉर्डमध्ये नर्स काय करतात, ते मी त्यावेळी पाहिलं. डॉक्टर जेव्हा तिच्या बारीक बारीक शिरा शोधण्याचा प्रयत्न करत होते, तेव्हा मी तिचे छोटे हात माझ्या हातात धरले होते. तेव्हा मला कसं वाटत होतं, ते मला माहीत आहे. त्यामुळे ती कुठल्याही गॉसिपचा भाग बनणार नाही.
मी माझ्या आयुष्याच्या या चॅप्टरबद्दल आणि माझ्या मुलीबद्दल खूप प्रोटेक्टिव्ह आहे.
कारण लोक जे बोलतात ते फक्त माझ्याबदद्लच नाही, तर तिच्या आयुष्याबद्दलही बोलतात.”
Web Title :- Priyanka Chopra | priyanka chopra reacts on trolling around daughter malti marie birth says my daughter will not be gossip
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Rakul Preet Singh | अभिनेत्री रकुल प्रीत सिंहच्या लाल कलरच्या साडीने चाहत्यांना लावले वेड
Avadhoot Gupte | अवधूत गुप्तेंची लवकरच होणार राजकारणात एंट्री; घोषणा करत म्हणाले…