Priyanka Chopra | अभिनेत्री प्रियंका चोप्राने जागतिक स्तरावर बॉलिवूडवर केलेले ‘ते’ वक्तव्य चर्चेत

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Priyanka Chopra | बॉलिवूडमध्ये ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून प्रियंका चोप्राची ओळख आहे. तिने तिच्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वतःचे असे स्थान निर्माण केले आहे. सध्या प्रियंका चोपडा चर्चेत असण्यामागचे कारण तिने केलेले वक्तव्य आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये बॉडी शेमिंगवर जास्त भर दिले जात असल्याचे मत प्रियंका चोप्राने एका मुलाखतीत मांडले होते. (Priyanka Chopra)

 

प्रियंकाने दिलेल्या एका मुलाखतीत तिने बॉलिवूडमध्ये तिला मिळालेल्या वाईट वागणुकीचा त्याचबरोबर कशा पद्धतीने बॉलिवूडमध्ये स्त्री-पुरुष भेदभाव केला जातो, याचा खुलासा केला आहे. एवढेच नाही तर बॉलिवूडमध्ये बॉडी शेमिंगवरदेखील कसे ऐकून घ्यावे लागते, याचा खुलासा यावेळी तिने केला. (Priyanka Chopra)

 

प्रियंका म्हणाली की, “बॉलिवूडमध्ये अभिनेत्यांची बरोबरी अभिनेत्रींशी कधीच केली जात नाही. त्यांच्यापेक्षा कमी मानधन हे अभिनेत्रीला दिले जाते. एवढेच नाही मी माझे सीन्स नसतानादेखील तासन् तास सेटवर हजर राहून बसून राहायचे. मात्र, माझ्याबरोबर काम करणारे हिरो आधीच सांगायचा जेव्हा माझे सीन लागतील तेव्हा मी सेटवर दिसेल. एवढेच नाही तर मला माझ्या रंगावरूनदेखील बोलले जायचे. मला ‘काळी मांजर’ ‘सावळी’ म्हणूनदेखील बोलले गेले होते. भारतात जवळपास सगळेच सावळ्या रंगाचे असतात आणि मला सारखे असे वाटायची की मी इतकी सुंदर नाही मला खूप मेहनत घ्यावी लागेल. माझ्यासह माझ्या गोऱ्या सहकलाकारांच्या तुलनेत मी जरा कमी असल्याची भावना मला सतत वाटायची. मात्र, कालांतराने सगळं काही ठीक होत गेलं आणि असं वाटत चालले की, सगळं आता नॉर्मल बनले आहे.

 

प्रियंका चोप्राने 2002 पासून आपल्या करिअरला सुरुवात केली आहे.
थज्मिझान या तमिळ चित्रपटातून तिने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.
त्यानंतर तिने बॉलिवूडमध्ये काम करण्यास सुरुवात केली. आपल्या चमकदार कामगिरीने देशातच नाही तर परदेशातही नाव कमावले.
पण, बॉलिवूडमध्ये आलेले कटू अनुभव प्रियांका अजूनही विसरलेली नाही.

 

Web Title :- Priyanka Chopra | priyanka chopra reveals she was called kaali billi due to dark skin only once received equal pay

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Indian Railway | रात्री दहानंतर रेल्वेत आवाज केल्यास गाडीतून उतरावे लागेल

CitiusTech Expands Footprint | सिटीअसटेकने पुण्यात नवीन सुविधांद्वारे केला फूटप्रिंटचा विस्तार

Mohit Kamboj Target Sushma Andhare | ‘सुषमा अंधारे संजय राऊतांचे फीमेल व्हर्जन’ – मोहीत कंबोज