‘देसी गर्ल’ प्रियंकाला होतंय फेअरनेस क्रीमची जाहिरात केल्याचं दु:ख ! म्हणाली – ‘गोरी दिसावी म्हणून मी…’

पोलिसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस प्रियंका चोपडा (Priyanka Chopra) आपल्या स्टाईल आणि फॅशनसाठी कायमच चर्चेत असते. तिचे अनेक आऊफिट्स आजवर चर्चेचा विषय ठरले आहेत. प्रियंका चोपडा सध्या पती निक जोनास (Nick Jonas) सोबत मॅरिड लाईफ एन्जॉय करत आहे. आज ती ग्लोबल स्टार म्हणून ओळखली जाते. प्रियंका आपल्या काही फोटो आणि व्हिडीओमुळं अनेकदा चर्चेत आली आहे. अनेकदा ती विविध मुद्द्यावर खुलून बोलताना दिसत असते. पुन्हा एकदा तिनं अशा मुद्द्यावर भाष्य केलं आहे ज्यावरून एकेकाळी भारतात तिला खूप विरोधाचा सामना करावा लागला होता. हा मुद्दा आहे फेअरनेस क्रीमच्या जाहिरातीचा.

अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत बोलताना प्रियंका म्हणाली, तिला फेअरनेस क्रीमची जाहिरात केल्याचं खूप दु:ख आहे. या जाहिरातीमुळं भारतात तिला खूप विरोधाचा सामना करावा लागला होता. हॉलिवूडमध्ये पाऊल टाकल्यानंतर तिनं अशी अ‍ॅड न करण्याचा निर्णय घेतला. तिच्या मते, एक भारतीय अ‍ॅक्टर म्हणून अशी जाहिरात करणं ही साधारण बाब आहे कारण, इंडस्ट्रीत अनेक अ‍ॅक्टर अशी जाहिरात करतात.

प्रियंकानं अनफिनिश्ड या तिच्या पुस्तकात यावर भाष्य केलं आहे. यात तिनं लिहिलं की, जेव्हा एखादी महिला अ‍ॅक्टर अशी अ‍ॅड करते तेव्हा याला वाईट मानलं जातं. माझ्यासाठीही हे करणं चुकीचं आहे. मी लहान मुलगी होते तेव्हा गोरी दिसण्यासाठी टॅल्कम पावडर लावत होते. कारण मला वाटत होतं की, डार्क स्कीन असणं चांगलं नाहीये.

2015 मध्ये प्रियंकानं अशा जाहिरातींपासून स्वत:ला दूर ठेवण्याचा निर्णय घेतला होता. प्रियंका सांगते की, कुटुंबात तिची इतर भावंडं गोरी होती. तीच डार्क स्कीन होती. सगळे तिची मजा घेत तिला काळी काळी म्हणून चिडवत असत.

प्रियंकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर नुकतीच ती व्हाईट टायगर सिनेमात दिसली आहे. नेटफ्लिक्सवर रिलीज झालेल्या या सिनेमात तिच्यासोबत राजकुमार राव प्रमुख भूमिकेत होता. अशीही माहिती आहे की, पीसी(प्रियंका) संजय लीला भन्साळींच्या बैजू बावरा या आगामी सिनेमात रणवीर सिंगसोबत दिसणार आहे. याशिवाय ती अ‍ॅमेझॉन स्टुडिओजच्या शीला या सिनेमातही काम करणार आहे. या सिनेमात ती मां शीला आनंदची भूमिका साकारणार आहे. हॉलिवूडच्या मॅट्रीक्स 4 आणि टेक्स्ट फॉर यु या सिनेमातही ती काम करताना दिसणार आहे. तिच्याकडे वी कॅन बी हिरोज (We Can Be Heroes) हा सिनेमाही आहे.