‘नेपोटिझम’च्या वादातून आलिया भट्टच्या हातातून निसटताहेत मोठे सिनेमे ? जाणून घ्या ‘सत्य’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमध्ये घराणेशाहीवरून मोठा वाद सुरू आहे. फक्त पब्लिकच नाही तर यामध्ये इंडस्ट्रीमधील काही कलाकारांनी देखील घराणेशाही विरोधात आवाज उठवला आहे. लोकांनी सोशल मीडियावर स्टार किड्सचे सिनेमा बॅन करण्याची मागणी केली आहे. या रोषाचा पहिला सामना आलिया भट्टच्या सडक 2 या सिनेमाला करावा लागला आहे. सडक 2 सिनेमाच्या ट्रेलरने सर्वाधिक नापसंतीचा ट्रेलर असा रेकॉर्ड केला आहे.आता अशी अफवा सुरु आहे की, दिग्दर्शक एसएस राजमौलीने त्याचा सिनेमा आरआरआर मधून आलीय भट्टला काढून टाकलं, आणि त्या ठिकाणी प्रियांका चोपडा असणार आहे.

पण ही अफवा आहे, आलीया अजूनही आरआरआर टीममध्ये काम करत असून फिल्म साठीची तिची तयारी सुरु आहे. आलियाच्या टीम मधील एका सदस्याने सांगितले की, आलीयाला तिच्यामध्ये असलेलं टॅलेंट पाहून राजमौलीने सिनेमासाठी निवडलं ,तिचं बॅकग्राउंड पाहिलं नाही. अशा प्रकारच्या खोट्या अफवा अलियाबद्दल विनाकारण पसरवल्या जात आहेत.

आलिया भट्टचे आगामी चित्रपट
आरआरआर शिवाय आलियाचे आणखी काही सिनेमा येणार आहेत ते म्हणजे, आयन मुखर्जीचा ‘ब्रह्मस्त्र’ करण जोहरचा ‘तख्त’ आणि संजय लीला भन्साळीचा ‘गंगुबाई काठियावाडी’

आरआरआर
आरआरआर या सिनेमात अजय देवगन, ज्युनियर एनटीआर, रामचरण आणि आलिया भट्ट दिसणार आहेत. सिनेमात अजय देवगन रामचरण आणि ज्युनियर एनटीआरच्या गुरूच्या भूमिकेत दिसणार आहे.

10 भाषांमध्ये होणार प्रदर्शित
डीवीवी दानय्या द्वारे निर्मित आणि एसएस राजमौली द्वारे निर्देशित आरआरआर हा सिनेमा जगात एकावेळी 10 भाषांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. सिनेमा 8 जानेवारी 2021 ला प्रदर्शित होणार आहे.

काल्पनिक कथा
ही एक काल्पनिक कथा आहे जी भारताचे स्वतंत्र सेनानी अल्लूरी सीताराम राजू आणि कोमाराम भीम यांच्या जीवनावर आधारित आहे. त्यांनी ब्रिटिश आणि हैद्राबादच्या निजामासोबत लढाई लढली होती.

भारी भक्कम बजेट
जवळजवळ 400 कोटी रुपये खर्च करून बनवण्यात आलेला हा सिनेमा भारतातील सर्वात जास्त महागडा सिनेमा ठरणार आहे. राजमौलीचा आधीचा सिनेमा बाहुबलीने ओवरसीज मध्ये 1000 कोटींपेक्षा अधिक कमाई केली होती.

एस एस राजमौली
एस एस राजमौलीने बाहुबली सिरीज, इगा, मगधीरा असे बिग बजेटवाले सिनेमे केले आहेत. आता आरआरआर सिनेमा कडून अशीच आशा आहे. हा सिनेमा 2021 मध्ये प्रदर्शित होईल.