‘मी तुमच्यापुढे भीक मागते, कृपा करून…’, प्रियांका चोप्राने केली कळकळीची विनंती

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   देशातील कोरोना महामारीची स्थिती बघून सर्वांनाच धडकी भरली आहे. देशी गर्ल प्रियंका चोप्राही भारतातील ही स्थिती बघून चिंतीत आहे.अशात तिने भारतातील आपल्या सर्व चाहत्यांना घरात राहण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, भारतात कोरोनामुळे (corona) हाहाकार माजला आहे. रोज शेकडो मृत्यू होत आहेत. रूग्णालयात बेड नाहीत, ऑक्सिजन नाही, रेमडेसिवीर सारख्या औषधांचा तुटवडा आहे. अशास्थितीत सगळीकडे दहशतीचे वातावरण आहे.

Priyanka Story.JPG

ही परिस्थिती पाहून प्रियंकाने लिहिले, की ‘संपूर्ण भारतात कोरोनाची स्थिती गंभीर आहे. देशातील वेगवेगळ्या भागातील फोटो व स्टोरीज पाहत आहे. हे चित्र प्रचंड भीतीदायक आहे. स्थिती नियंत्रणाबाहेर आहे. कृपा करून घरात राहा. मी तुमच्यापुढे भीक मागते, कृपा करून घराबाहेर पडू नका. स्वत:साठी, स्वत:च्या कुटुंबासाठी, मित्रांसाठी, शेजा-यांसाठीही हे गरजेचे आहे. प्रत्येक एक डॉक्टर आणि फ्रंट लाइन वर्करही हेच सांगतो आहे.

priyanka story 2.JPG

घराबाहेर पडावेच लागले तर मास्क लावा. महामारीचे गांभीर्य समजून घेण्याचा प्रयत्न करा. लस घ्या़ यामुळे आपल्या वैद्यकीय यंत्रणेवरचा ताण कमी होण्यास मदत होईल,’ असे प्रियंकाने लिहिले आहे.

priyanka story 3.JPG

तिच्या या पोस्टवरून तरी हेच दिसत आहे की विदेशात राहून तिला मायदेशीच्या लोकांची चिंता सतावते आहे. प्रियंकाचा ‘द व्हाईट टायगर’ हा सिनेमा नुकताच रिलीज झाला. लवकरच ती हॉलिवूडच्या काही सिनेमात दिसणार आहे. प्रियंका चोप्रा सध्या न्यूयॉर्कमध्ये आहे.