अभिनेत्री प्रियंका चोपडा सलमान खानच्या ‘भारत’ चित्रपटाबाबत मोठं वक्‍तव्य

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा भारत सिनेमा नुकताच रिलीज झाला आहे. सध्या हा सिनेमा जबरदस्त कमाई करताना दिसत आहे. ईदला रिलीज झालेल्या या सिनेमाचे क्रेज काही थांबताना दिसत नाही. अवघ्या 9 दिवसात या सिनेमाने 180 कोटींहून अधिक कमाई केली आहे. विशेष म्हणजे या सिनेमातील सलमान आणि कॅटरीनाची रोमँटीक केमिस्ट्रीही चाहत्यांना भावली आहे असे दिसत आहे.

तुम्हाला माहीत असेल की, या सिनेमात कॅटरीना कैफने प्रियंका चोपडाला रिप्लेस केले आहे. देसी गर्ल प्रियंकाने अचानक या सिनेमात काम करण्यासाठी नकार दिला होता. आतापर्यंत असे म्हटले जात होते की, प्रियंकाने तिच्या आणि निकच्या लग्नामुळे या सिनेमात काम करण्यास नकार दिला होता. परंतु प्रियंकाच्या एक्झिटमागे काही दुसरेच कारण असल्याचे समजत आहे.

तुम्हाला सांगू इच्छितो की, प्रियंकाने हा सिनेमा साईन केल्यानंतर अचानक या सिनेमातून काढता पाय घेतला. या सिनेमाचे दिग्दर्शक आणि खुद्द सलमान खान यानेही सांगितले होते की, प्रियंकाने लग्नामुळे हा सिनेमा सोडला आहे. यानंतर असेही वृत्त समोर आले होते की, सलमान खान प्रियंका चोपडावर नाराज आहे. परंतु नुकताच प्रियंकाने याबाबत खुलासा केला आहे.

प्रियंका म्हणाली की, “सगळेच मला माझ्या निर्णयाबद्दल विचारत आहेत की, अखेर मी का भारत सिनेमा सोडला ? मी का हा नाचगाणं असणारा तडकता भडकता सिनेमा सोडला आणि 18 वर्षाच्या मुलाच्या आईची भूमिका साकारत आहे ? मी सोनाली बोसचा द स्काय इज पिंक हा सिनेमा यासाठी निवडला कारण सोनालीच्या या सिनेमाची आयडिया आवडली. म्हणूनच मी या सिनेमात काम करायला तयार झाले.” त्यामुळे आता असं म्हटलं जात आहे की, द स्काय इज पिंक या सिनेमामुळे तिने भारत सिनेमा सोडला.

सिने जगत –

‘शिळया कडीला ऊत’ ! शोएब अख्तरकडून अभिनेत्री सोनाली बेंद्रेबाबत धक्‍कादायक ‘गौप्यस्फोट’

‘या’ टॉप ५ अभिनेत्रींचा चेहरा खुपच ‘भोळा’, ‘ती’ अभिनेत्री बॉलिवूडमध्ये नंबर २ वर, पहा सर्व फोटो

‘त्या’ कपड्यांवर मलायका अरोरा पुन्हा एकदा हॉस्पीटल ‘समोर’च दिसली, चाहत्यांमध्ये ‘नरम-गरम’ चर्चा

Loading...
You might also like