Video : ‘देसी गर्ल’ प्रियंकानं शेअर केलं मेकअप ट्युटोरियल ! चाहते म्हणाले…

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस प्रियंका चोपडा (Priyanka Chopra) आपल्या स्टाईल आणि फॅशनसाठी कायमच चर्चेत असते. तिचे अनेक आऊफिट्स आजवर चर्चेचा विषय ठरले आहेत. प्रियंका चोपडा सध्या पती निक जोनास (Nick Jonas) सोबत मॅरिड लाईफ एन्जॉय करत आहे. आज ती ग्लोबल स्टार म्हणून ओळखली जाते. प्रियंका आपल्या काही फोटो आणि व्हिडीओमुळं अनेकदा चर्चेत आली आहे. सध्या तिचा एका व्हिडीओ खूप अटेंशन घेताना दिसत आहे.

प्रियंकानं तिच्या इंस्टावरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. आपल्या चाहत्यांना प्रियंका मेकअप शिकवताना दिसत आहे. खास बात अशी की, यावेळी प्रियंका बिनामेकअप दिसून आली. तिला असं पाहून चाहतेही तिचं भरभरून कौतुक करताना दिसत आहेत.

प्रियंकाचे हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. चाहत्यांना तिचा हा लुक खूप आवडला आहे. अनेकांनी लाईक्स आणि कमेंट करत तिचं कौतुक केलं आहे. काहींनी तिला क्वीन म्हटलं आहे तर काही तिला ब्युटी म्हणत आहेत.

प्रियंकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर नुकतीच ती व्हाईट टायगर सिनेमात दिसली आहे. नेटफ्लिक्सवर रिलीज झालेल्या या सिनेमात तिच्यासोबत राजकुमार राव प्रमुख भूमिकेत होता. अशीही माहिती आहे की, पीसी(प्रियंका) संजय लीला भन्साळींच्या बैजू बावरा या आगामी सिनेमात रणवीर सिंगसोबत दिसणार आहे. याशिवाय ती अ‍ॅमेझॉन स्टुडिओजच्या शीला या सिनेमातही काम करणार आहे. या सिनेमात ती मां शीला आनंदची भूमिका साकारणार आहे. हॉलिवूडच्या मॅट्रीक्स 4 आणि टेक्स्ट फॉर यु या सिनेमातही ती काम करताना दिसणार आहे. तिच्याकडे वी कॅन बी हिरोज (We Can Be Heroes) हा सिनेमाही आहे.