देसी गर्ल प्रियंकाच्या ‘या’ छोट्या ‘क्लच’ची किंमत ऐकून चकित व्हाल !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड ते हॉलिवूडपर्यंतचा प्रवास करणारी देसी गर्ल प्रियंका चोपडाची प्रत्येक अदा चाहत्यांसाठी खास असते. गेल्या अनेक दिवसांपासून ती आपल्या लुक आणि ड्रेसमुळे चर्चेत येताना दिसत आहे. प्रियंकाच्या महागड्या अ‍ॅक्सेसरीज चाहत्यांना नेहमीच अवाक करत असतात. प्रियंकाने एक असा क्लच घेतला होता ज्याची किंमत ऐकून भल्या भल्यांनी डोळे पांढरे केले आहेत.

https://www.instagram.com/p/B1hIeyWBBXX/

प्रियंका नुकतीच आपला दीर आणि हॉलिवूड सिंगर जोनसच्या पार्टीत सहभागी झाली होती. या थीम बर्थ डे पार्टीत प्रियंकाचा ब्लॅक ड्रेसवाला लुक खूपच चर्चेत आला होता. या ड्रेससोबत तिने जो क्लच आणला होता त्याने सर्वांनाच चकित केले.

https://www.instagram.com/p/B1Srj91BHn4/

ब्लॅक ड्रेससोबत प्रियंकाने वाल्टर्स फेथ डायमंड इयररिंग्स आणि जिमी चू ब्रँडचा एक शिमरी क्लच सोबत आणला होता. अशी माहिती समोर आली आहे की, या क्लचची किंमत इतकी आहे की, एखादा त्यामध्ये महागड्या व्हॅकेशनवर जाऊ शकतो. या क्लचची किंमत 1850 डॉलर म्हणजेच 1 लाख 32 हजार रुपये इतकी आहे.

https://www.instagram.com/p/B1ekmNEhGSl/

प्रियंकाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर लवकरच ती द स्काय इज पिंक या सिनेमात दिसणार आहे. हा सिनेमा ऑक्टोबर 2019 मध्ये रिलीज होणार आहे.

https://www.instagram.com/p/B1RfERvhmLX/

https://www.instagram.com/p/B0TiZZNBzs2/