Video : ‘देसी गर्ल’ प्रियंकाच्या मिस वर्ल्ड गाऊनचा निघाला होता टेप ! नमस्कार करत ‘अशी’ हाताळली परिस्थिती

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलिवूड स्टार प्रियंका चोपडा (Priyanka Chopra) आपल्या स्टाईल आणि फॅशनसाठी कायमच चर्चेत असते. तिचे अनेक आऊफिट्स आजवर चर्चेचा विषय ठरले आहेत. परंतु असेही काही आऊफिट आहेत ज्यात तिला खूप अनकंफर्मटेबल वाटलं होतं. खुद्द प्रियंकानंच याबाबत एका मुलाखतीत सांगितलं आहे.

अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत बोलताना प्रियंका म्हणाली, तिचे 2 आउटफिट्स आतापर्यंत खूपच अनकंफर्टेबल ठरले होते. त्यातील एक ड्रेस असा होता जो तिनं मिस वर्ल्ड 2000 ब्युटी पेजेंट (Miss India 2020: Beauty Pageant) दरम्यान घातला होता.

प्रियंकानं सांगितलं की, व्हाईट आयकॉनिक ड्रेस टेपला चिकटली होती. ओढताण झाल्यानं टेप निघाली होती. परंतु तिनं वेळेवर परिस्थिती हाताळत नमस्काराची पोज दिली होती. प्रियंकानं सांगितलं की, लोकांना वाटलं हा नमस्कार पंरतु मी ड्रेस सांभाळण्यासाठी असं केलं होतं.

आणखी एका पॉप्युलर लुकबद्दल बोलताना प्रियंका म्हणाली, हा लुक मेट गाला 2018 ( Met Gala 2018) चा होता. या लुकमध्ये तिला श्वासही घेता येत नव्हता. डिनरवेळी तिला पोटभर खाताही आलं नव्हतं. अनेकांना वाटलं होतं की, तिचा शेप बदललाय.

प्रियंकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ती व्हाईट टायगर सिनेमात दिसणार आहे. नेटफ्लिक्सवर रिलीज होणाऱ्या या सिनेमात तिच्यासोबत राजकुमार राव असेल. अशीही माहिती आहे की, पीसी(प्रियंका) संजय लीला भन्साळींच्या बैजू बावरा या आगामी सिनेमात रणवीर सिंगसोबत दिसणार आहे. याशिवाय ती अ‍ॅमेझॉन स्टुडिओजच्या शीला या सिनेमातही काम करणार आहे. या सिनेमात ती मां शीला आनंदची भूमिका साकारणार आहे. असंही म्हटलं जात आहे की, हॉलिवूडच्या मॅट्रीक्स 4 या सिनेमातही ती काम करण्याची शक्यता आहे.