‘भाईजान’ सलमान खानशी ‘पंगा’ घेतल्यानंतरही ‘या’ अभिनेत्रीला भलतचं ‘डिमांड’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मुंबईहून लॉस एंजेलिस पर्यंत प्रवास करणारी प्रियंका चोपडा खरोखरच भारताची ग्लोबल सुपरस्टार आहे. खान त्रिकूटांचे चित्रपट जरी भारतात आणि यूरोप, कॅनडा, अमेरिकेमध्ये चालत असतील परंतु, प्रियंकाने हॉलिवूडमध्ये तिच्या गायन आणि अभिनयावर वर्चस्व गाजवले आहे. प्रियंका चोपडा त्या दुर्मिळ अभिनेत्रींपैकी आहे, जीने सलमान खानला नाराज केल्यानंतर देखील तिच्या कारकिर्दीवर कोणताही प्रभाव पडला नाही. याआधी सलमान खानसोबत पंगा घेतल्यामुळे अ‍ॅक्टर विवेक ओबेरॉय आणि सिंगर अरिजीत सिंगला खूप गोष्टींना समोर जावे लागले.

View this post on Instagram

@red #5BFilm

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on

प्रियंकाने सलमानच्या भारत चित्रपटामध्ये काम करण्यास नकार दिला होता. त्यामुळे सलमान तिच्यावर खूप नाराज झाला होता. सलमानने अनेक इंटरव्यूज़ मध्ये प्रियंकाबद्दल वाईट कमेंट केल्या होत्या. त्यानंतर सोशल मीडियाने आणि फेमिनिस्ट्स ग्रुप्सने तिचे विवेचन केले. अनेक रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, प्रियंकाला निकसोबत लग्न करायचे होते. त्यामुळे तीने सलमानच्या चित्रपटातून वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. तर काही रिपोर्ट्स मध्ये असे देखील सांगितले की, प्रियंका हॉलीवूडमध्ये जाऊन व्यावसायिकता आणि अनुशासनास महत्त्व देऊ लागली आहे आणि ती सेटवर रिलॅक्स राहणाऱ्या सलमानसोबत काम करू इच्छित नाही.

Loading...
You might also like