Video : अध्यात्म आणि धर्माबद्दल प्रियंका चोपडाचं मोठं वक्तव्य, म्हणाली – ‘माझे वडिल मशिदीत…’

पोलिसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस प्रियंका चोपडा (Priyanka Chopra) आपल्या स्टाईल आणि फॅशनसाठी कायमच चर्चेत असते. तिचे अनेक आऊफिट्स आजवर चर्चेचा विषय ठरले आहेत. प्रियंका चोपडा सध्या पती निक जोनास (Nick Jonas) सोबत मॅरिड लाईफ एन्जॉय करत आहे. आज ती ग्लोबल स्टार म्हणून ओळखली जाते. प्रियंका आपल्या काही फोटो आणि व्हिडीओमुळं अनेकदा चर्चेत आली आहे. सध्या प्रियंकाचा ओपरा विनफ्रेला दिलेला इंटरव्ह्यु चर्चेत आला आहे. त्याचा काही भाग सोशलवर व्हायरल होत आहे. या प्रियंका भारतातील एकतेबद्दल आणि धर्माबद्दल सांगत आहे. लवकरच तिची पूर्ण मुलाखत समोर येणार आहे.

ओपराच्या एका प्रश्नाला उत्तर देताना प्रियंका म्हणाली, मला वाटतं की, माझा अध्यात्मिक आधार राहिला आहे. भारतात असं कमीच पहायला मिळतं. मी कॉन्वेंट शाळेत शिकल्यानं मला ईसाई धर्माबद्दल माहिती आहे. माझे वडिल एका मशिदीमध्ये जायचे. त्यामुळं मला इस्लाम बद्दल माहिती आहे. मी हिंदू कुटुंबात लहानची मोठी झाले. त्यामुळं मला हिंदू धर्माबद्दल माहित आहे. अध्यात्मिकता भारताचा खूप मोठा भाग आहे, ज्याकडे तुम्ही वास्तवात दुर्लक्ष करू शकत नाहीत.

प्रियंका म्हणाली तिला विश्वास आहे

प्रियंका पुढं बोलताना म्हणाली, मी एक हिंदू आहे. मी पूजा करते. माझ्या घरात मंदिरही आहे. मी नेहमी पूजा करते. मी असं मानते की, एक शक्ती अस्तित्वात आहे. मला त्यावर विश्वास आहे.

प्रियंकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर नुकतीच ती व्हाईट टायगर सिनेमात दिसली आहे. नेटफ्लिक्सवर रिलीज झालेल्या या सिनेमात तिच्यासोबत राजकुमार राव प्रमुख भूमिकेत होता. अशीही माहिती आहे की, पीसी(प्रियंका) संजय लीला भन्साळींच्या बैजू बावरा या आगामी सिनेमात रणवीर सिंगसोबत दिसणार आहे. याशिवाय ती अ‍ॅमेझॉन स्टुडिओजच्या शीला या सिनेमातही काम करणार आहे. या सिनेमात ती मां शीला आनंदची भूमिका साकारणार आहे. हॉलिवूडच्या मॅट्रीक्स 4 आणि टेक्स्ट फॉर यु या सिनेमातही ती काम करताना दिसणार आहे. तिच्याकडे वी कॅन बी हिरोज (We Can Be Heroes) हा सिनेमाही आहे.