‘देसी गर्ल’ प्रियंका चोपडासाठी मियामी बर्थ डे सेलिब्रेशन ठरलं ‘डोकेदुखी’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – देसी गर्ल प्रियंका चोपडाने जेव्हापासून आपले मियामी बर्थ डे सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत. तेव्हापासून ट्रोलर्सना तिच्यावर संतापण्याची संधीच मिळाली आहे. लग्नानंतर आपल्या बर्थडे चे समुद्रकिनारी प्रियंकाने ग्रँड सेलिब्रेशन केले. परंतु युजर्स मात्र तिला एकेका फोटोवरून ट्रोल करत आहेत.

असे दिसत आहे की, ट्रोलर्सना प्रियंकाच्या फॅशन सेंस आणि रोमँटीक पोजपासून अडचण आहे. इतकेच नाही तर काहींना भयानक पूरादरम्यान प्रियंकाने पीडितांसाठी काळजी व्यक्त न केल्याने प्रॉब्लेम आहे.

प्रियंकाने पती निकसोबतचे काही रोमँटीक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोत प्रियंका पिंक कलरच्या बिकीनीत दिसत आहे. बिकीनीसोबतचे तिने हातात ग्लव्ज घातले आहेत. प्रियंकाचा हाच फॅशन सेंस लोकांना खटकत आहे.

प्रियंकाच्या आउटफिटवर सवाल उपस्थित करत ट्रोलर्सने विचारले की, प्रियंकाने बिकीनीसोबत ग्लव्ज का घातले आहेत ? काहींनी तिची फॅशन 50 च्या दशकातील असल्याचं म्हटलं आहे.

काहीं लोक यामुळे नाराज आहेत की, आसाम मध्ये पूर आल्यानंतर तेथील लोकांची अवस्था दयनीय झालेली असताना प्रियंका मात्र मस्त एन्जॉय करत आहे. एका युजरने लिहिले की, “प्रियंका तुला लाज वाटायला हवी. आसाम मध्ये पूर आला आहे. तेथील ब्रँड अॅम्बेसेडर या नात्याने तुला त्या लोकांची मदत करायला हवी. परंतु तू तर सिगारेट पीत हॉलिडे एन्जॉय करताना दिसत आहेस.”

ट्रोलर्सने तर असेही म्हटले आहे की, प्रियंका असमची ब्रँड अॅम्बेसेडर नसावी. प्रत्यक्षात मात्र असममध्ये पूर आल्यानंतर प्रियंकाने ट्विट करत चिंता व्यक्त केली होती. परंतु हेटर्सना तर हे माहीत करून घ्यायचं आहे की, प्रियंकाने राज्यातील लोकांच्या मदतीसाठी काय योगदान दिले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –