‘देसी गर्ल’ प्रियंकाच्या घरी येणार नवा पाहुणा ! काम्यानं पतीला केलं KISS

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार प्रियंका चोपडाच्या जेठ आणि जेठानीच्या म्हणजेच तिची जावूबाई सोफी आणि जो यांच्या घरी नवीन तिसरा पाहुणा येणार आहे. प्रियंकाचा दीर जो. जोनास आणि आणि त्याची पत्नी सोफी टर्नर आई वडिल होणार आहेत. सोफी सध्या प्रेग्नंट असल्याची माहिती आहे. एका इंग्रजी वृत्तपत्रानं याबाबत माहिती दिली आहे. परंतु जो आणि सोफीनं अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोफी टर्नर जवळपास 4 महिन्यांपासून प्रेग्नंट आहे. सोफी या गोष्टीमुळे खूप उत्साहित असल्याचं समजत आहे. दोघांनी आपल्या कुटुंबियांना आपल्या येणाऱ्या बाळाबद्दल सांगितलं आहे. ही बातमी ऐकून घरातील सर्वच कुटुंबीय खुश असल्याचंही समजत आहे.

जोनास ब्रदर्स सध्या हॅप्पीनेस बिगिन्स टूरवर आहेत. सध्या ते आपल्या एका म्युझिक टूरच्या निमित्तानं युरोपमध्ये आहेत. जो आणि सोफी गेल्यावेळी ग्रॅमी अवॉर्ड 2020 मध्ये एकत्र दिसले होते. या अवॉर्ड शोमध्ये जोनं निक आणि केविन सोबत मिळून आपलं नवीन गाणं What A Man Gotta Do सादर केलं होतं. यावेळी प्रियंका चोपडाही उपस्थित होती.