लहान मुलीसह प्रियंका चोपडाची स्विमींग पुलामध्ये मस्ती अन् धमाल (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार प्रियंका चोपडा कितीही बिजी असली तरी आपल्या कुटुंबासाठी आणि जवळच्या व्यक्तींसाठी ती नेहमीच वेळ काढत असते. हेच सिद्ध करणारा प्रियंकाचा खूपच क्युट व्हिडीओ समोर आला आहे जो सध्या व्हायरल होताना दिसत आहे. प्रियंकाने इंस्टाग्रामवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत दिसत आहे की, प्रियंका चोपडा तिची स्टायलिस्ट दिव्या ज्योतीची मुलगी कृष्णा स्काय सर्किसिअनसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसत आहे. कृष्णाला कडेवर घेऊन प्रियंका चोपडा तिच्याशी क्युट अंदाजात गप्पा मारताना दिसत आहे. दोघीही एकमेकींना क्युट बोलत आहे. प्रियंका कृष्णाला क्युट म्हणते तर कृष्णा प्रियंकाला क्युट म्हणताना व्हिडीओत दिसत आहे. व्हिडीओ शेअर करताना प्रियंका म्हणते, आम्ही दोघीही क्युट आहेत.” प्रियंकाच्या अनेक चाहत्यांनी आणि इतर स्टार्सनेही प्रियंकाच्या या व्हिडीओवर कमेंट कली आहे.

प्रियंकाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, लवकरच ती शोनाली बोस दिग्दर्शित सिनेमा द स्काय इज पिंकमध्ये दिसणार आहे. 11 ऑक्टोबर रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर चाहत्यांना खूप आवडला आहे. याशिवाय प्रियंका द व्हाईट टायगर या नेटफ्लिक्सच्या वेब सीरीज मध्ये दिसणार आहे.

https://www.instagram.com/p/B2qq7bTnDUz/

 

Visit : policenama.com