…म्हणून प्रियांका चोपडाच्या भावाचे लग्न पुढे ढकलेले… प्रियांका लगेचच अमेरिकेला परतली

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोपडा हिच्या भावाचे लग्न गेल्या आठवड्यात होणार होते. परंतु हे लग्न आता पुढे ढकलण्यात आले आहे. प्रियांका भावाच्या लग्नासाठी मुंबईत दाखल झाली होती परंतु लग्न पुढे ढकल्याने ती परत अमेरिकेला गेली आहे. सिद्धार्थ असं प्रियांकाच्या भावाचे नाव असून इशिता कुमार असं त्याच्या होणाऱ्या पत्नीचे नाव आहे. सिद्धार्थ आणि इशिता यांचे लग्न आता पुढे ढकलण्यात आले आहे.

सिद्धार्थ चोपडा आणि इशिता कुमार यांचे लग्न गेल्याच आठवड्यात होणार होते. परंतु इशिता कुमारची तब्येत अचानक बिघडली. तिच्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. त्यामुळे आता दोघांचेही लग्न पुढे ढकलण्यात आले आहे. प्रियांका चोपडा पती निक जोन्ससह दहा दिवसांपूर्वीच मुंबईत दाखल झाली होती. परंतु आता भाऊ सिद्धार्थचे लग्न पुढे ढकलल्याने ती अमेरिकेला परत गेली आहे.

इशिताची तब्येत अचानक बिघडल्याने डॉक्टरांनी तिला आराम करण्यास सांगितले आहे. किमान 15 दिवस तरी इशिताने आराम करायला हवा असा सल्ला इशिताला डॉक्टरांनी दिला आहे. त्यामुळे लग्नाची तारीख पुढे ढकलली आहे. त्यामुळे प्रियांका चोपडा सोमवारी मतदान करून पती निक जोन्ससह अमेरिकेला परत गेली.

दरम्यान सिद्धार्थ चोपडा आणि इशिता कुमार यांचा रोका सेरेमनी फ्रेब्रुवारीमध्ये झाला. त्यानंतर एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात ते दोघे विवाहबद्ध होणार होते. परंतु हा विवाह आता पुढे ढकलण्यात आला आहे.