बाप रे !…. प्रियांका चोप्राच्या सासूने तिला दिले एवढे महाग गिफ्ट

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन गायक निक जोनस यांच्यात १ डिसेंबर आणि २ डिसेंबर रोजी विवाह संपन्न झाला या विवाहा निमित्त निकच्या आईने म्हणजे प्रियांकाच्या सासूने प्रियांकाला जी कर्णफुले (इअरिंग्स) दिली याची किंमत ऐकून तुम्ही हि अवाक व्हाल.  प्रियांकाच्या सासूने  तिला ७९,५०० डॉलरची  म्‍हणजेच जवळपास ५५ लाख रुपये किंमतीची कर्णफुले गिफ्ट दिली आहेत.

राजस्थान येथील जोधपूर मधील उमेद भवन पॅलेसमध्‍ये निकचे वडील पॉल केविन जोनस आणि निकची आई  डेनिस जोनस यांच्या प्रमुख उपस्थित १ डिसेंबर रोजी ख्रिश्चन पध्द्तीने विवाह संपन्न झाला. यावेळी प्रियंकाच्या सासूने सुनमुख बघण्यासाठी तब्बल ५५ लाख रुपयांची कर्णफुले प्रियंकाला गिफ्ट म्हणू दिली आहेत. एका इंग्रजी संकेतस्थळाने या वृत्ताला दुजोरा दिला असून प्रियंकाला सासूबाईंनी दिलेले हे गिफ्ट फार आवडले आहे  असे या संकेतस्थळावर म्हणले आहे.

प्रियांका आणि निक यांचा ख्रिश्चन आणि हिंदू पद्धतीने विवाह संपन्न झाला आहे पहिल्या दिवशी म्हणजे १ डिसेंबर रोजी निक आणि प्रियांका यांचा  ख्रिश्चन पध्द्तीने विवाह संपन्न झाला असून प्रियांका आणि निक यांचा २ डिसेंबर रोजी भारतीय हिंदू पध्द्तीने विवाह संपन्न झाला. या विवाहासाठी बॉलिवूड मधील आणि हॉलिवूड मधील अनेक महत्वाच्या व्यक्ती उपस्थित होत्या त्याच बरोबर ७ डिसेंबर रोजी प्रियांका आणि निकच्या लग्नाचे रिसेप्शन राजधानी दिल्ली या ठिकाणी करण्यात येणार आहे.

निक आणि प्रियांका यांच्या लग्नाचे फोटो प्रियांकाने या अगोदरच एका इंग्रजी वेब पोर्टला विकले असून येत्या काळात त्यांच्या विवाहाचे फोटो मोठ्या प्रमाणावर  सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना  बघायला मिळतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तसेच लग्नाच्या आदल्या दिवशी पासून प्रियांका आणि निक यांनी आपल्या सोशल मीडियातील खात्यांवरून आपल्या रिलेशनशीपचे फोटो शेअर करून चाहत्यांच्या मध्ये लग्नाचा माहोल बनवण्याचा प्रयत्न केला होता.