प्रियांका चोप्राची आई मधू चोप्रा यांनी सिद्धार्थच्या लग्नाविषयी केला मोठा खुलासा

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – अभिनेत्री प्रियांका चोप्राचा भाऊ सिद्धार्थ चोप्रा याच्या लग्नाची चर्चा सोशल मिडियावर खुप व्हायरल झाली होती. सध्या त्याचे लग्न तुटल्याचे समोर येत आहे. लग्न तुटल्याची माहिती कितपत खरी आहे. हे अजून कोणाला माहित नाही. पण प्रियांकाची आई मधु चोप्रा यांनी याबाबत मोठा खुलासा केला आहे. ते सविस्तर जाणून घेऊया.

प्रियांकाचा भाऊ सिद्धार्थ चोप्रा याच्या लग्नाची तारीख ऐनवेळी पुढे ढकलली होती. त्यानंतर प्रियांका आणि तिची आई मधु चोप्रा यांनी इशिता कुमारला अनफॉलो केले. आता त्यांचे लग्न तुटल्याचे समोर आले आहे.

एका वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार २७ फेब्रुवारीला सिद्धार्थ आणि इशीता कुमार याची ‘रोका’ विधी झाली. भावाच्या लग्नासाठी प्रियांका मुंबईत आली होती. मात्र, लग्न पुढे ढकलण्यात आल्यामुळे ती पुन्हा न्यूयार्कला परतली. त्यानंतर इशिताने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंवरुन सिद्धार्थसोबतचे सगळे फोटो डिलीट केले. यामध्ये ‘रोका’ विधीचे देखील फोटो होते. यानंतर प्रियांका आणि सिद्धार्थ ने इशिताला अनफॉलो केले. अनफॉलोची चर्चाही खुप व्हायरल झाली.

यानंतर मधु चोप्रा यांनी सांगितले की, सिद्धार्थ व इशिताचे यांचे नाते संपुष्टात आले आहे. सिद्धार्थ आणि इशिताच्या सहमतीनुसार हे लग्न तुटले आहे. असे ते म्हणाले. मात्र, लग्न तुटल्याचे कारण अद्याप कळाले नाही. अचानक लग्न तुटल्याने चाहत्यांना याचे कारण कळाले नाही त्यामुळे सर्व विचारात आहे.