प्रियांका चोप्राचा ‘व्हेंटिलेटर’ नंतर ‘पाणी’

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाईन

प्रियांका चोप्राच्या प्राॅडक्शनखाली बनलेल्या ‘व्हेंटिलेटर’ या मराठी सिनेमाला प्रचंड यश मिळाल्यानंतर आता ती पुन्हा एकदा मराठी सिनेमाच्या निर्मितीकडे वळली आहे. स्वतःच्या बॅनरखाली बनवण्यात येणाऱ्या चौथ्या मराठी सिनेमाची घोषणा तिने केली आहे.या सिनेमाचं नाव ‘पाणी’ असे असणार आहे.

प्रियांका चोप्राचा ‘व्हेंटिलेटर’ नंतर ‘पाणी’

या सिनेमाचं दिग्दर्शन आदिनाथ कोठारे करणार आहे. मराठवाड्यातील नगदरवाडी या दुष्काळग्रस्त खेड्यात राहणाऱ्या सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यातली कथा आपल्याला या सिनेमात पहायला मिळणार आहे. या चित्रपटात आदिनाथ कोठारे, ऋचा वैद्य, सुबोध भावे, किशोर कदम, गिरीष जोशी यांच्या मुख्य भूमिका असणार आहेत.