गांधी घराण्याच्या बाहेरचा अध्यक्ष झाल्यास २४ तासात पक्ष फुटेल, ‘या’ काँग्रेस नेत्याचे वक्तव्य

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा शोध अजूनही सुरूच आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राहुल गांधी यांनी राजीनामा दिल्यानंतर अजूनपर्यंत पक्षात अध्यक्षपदाच्या नावावर एकमत होऊ शकलेले नाही. याचदरम्यान पक्षाचे वरिष्ठ नेते आणि माजी विदेश मंत्री नटवर सिंग यांनी प्रियंका गांधी यांना काँग्रेसचा अध्यक्ष बनवण्याचे म्हटले आहे. त्यांच्या मते प्रियंका गांधी यांच्यात अध्यक्ष बनण्यासाठी सर्व नेतृत्व गुण असून बाहेरचा अध्यक्ष झाल्यास २४ तासांत पक्ष फुटेल.

नाहीतर फुटेल कांग्रेस!

नटवर सिंग यांनी म्हटले कि, राहुल गांधी यांनी जरी म्हटले असले कि, गांधी घरातून आता कुणीही अध्यक्ष बनणार नाही मात्र त्यांना त्यांचा हा निर्णय बदलावा लागणार आहे. हि जबाबदारी गांधी घराचं योग्यरीत्या सांभाळू शकते, जर दुसरा बाहेरचा व्यक्ती बाहेरच्या अध्यक्ष झाल्यास २४ तासांत पक्ष फुटेल. त्याचबरोबर १३४ वर्ष जुन्या पक्षाला अध्यक्ष नसणे फार दुर्दैवी असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.

प्रियंका गांधींचे कौतुक

यावेळी नटवर सिंग यांनी प्रियांका यांच्या आंदोलनाचे देखल कौतुक केले. त्यांनी म्हटलं कि,त्यांनी ज्याप्रकारे हे आंदोलन हाताळले त्यावरून त्यांचे नेतृत्व कौशल्य दिसून येते.

प्रियंका यांना मिळत आहे समर्थन

राहुल गांधी यांच्या राजीनाम्यानंतर प्रियांका यांच्या समर्थनार्थ मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आवाज उठवत आहेत. माजी राष्ट्रपति प्रणव मुखर्जी यांचा मुलगा अभिजीत मुखर्जी याने देखील प्रियंका गांधींना अध्यक्ष करण्याची मागणी केली.

लोकसभेत दारुण पराभव

लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर त्याची जबाबदारी घेत राहुल गांधी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. या निवडणुकीत काँग्रेसला केवळ ५२ जागांवर विजय मिळवता आला.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like