‘हनुमान जयंती’च्या निमित्तानं प्रियंका गांधींना आली ‘बिग बी’ अमिताभच्या आईची आठवण !

पोलीसनामा ऑनलाईन :पूर्ण देशात 8 एप्रिल रोजी हनुमान जयंती साजरी केली जाच आहे. या निमित्तानं काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी वाड्रा यांनी बिग बी अमिताभ बच्चन यांच्या आईची आठवण काढली आहे. सोबतच त्यांनी एक खास मेसेजही दिला आहे.

प्रियंका गांधीनं ट्विट करत लिहिलं की, “श्रीमत तेजी बच्चन खूप मोठ्या हनुमान भक्त होत्या. त्या नेहमीच मंगळवारी दिल्लीतल्या हनुमान मंदिरात मला नेत असत आणि माझ्यासाठी काचेच्या बांगड्या खरेदी करत आणि मला हनुमानाच्या गोष्टी सांगत. त्यांच्याकडूनच मी हनुमान चालिसाचे अनेक श्लोक शिकले आहे. आज त्या नाहीत परंतु त्यांच्या भक्तीचं प्रतिक कायम हृदयात आहे.”

याआधी अमिताभ बच्चन यांचे वडिल हरिवंश राय बच्चन यांच्या जयंती निमित्त प्रियंकानं हरिवंशराय बच्चन यांच्यासाटी खास मेसेज लिहिला होता. हरिवंश राय बच्चन यांचा फोटो शेअर करत त्यांनी लिहिलं की, “हरिवंश राय जी ज्यांना आम्ही अंकल बच्चन नावानं ओळखायचो. इलाहाबादचे ते एक महान पुत्र होते. एक काळ असा होता जेव्हा माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर मी बच्चन यांच्या रचना वारंवार वाचायचे. त्यांच्या शब्दांनी माझ्या मनाला शांती मिळत असते. यासाठी मी त्यांची आयुष्यभर आभारी आहे.”

You might also like