प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर ‘हल्लाबोल’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून काँग्रेस आणि इतर पक्षांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. अशातच काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आपली तोफ डागली आहे. देशातील आर्थिक मंदी आणि महागाई या मुद्द्यांवरून त्यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

प्रियंका गांधींनी ट्विट करत म्हटलं की, “गेल्या तीन वर्षांत महागाईनं उच्चांक गाठला आहे. दैनंदिन जीवनात आवश्यक असणाऱ्या वस्तू घेताना सर्व सामान्य जनतेच्या खिशाला कात्री लागत आहे. देशातील आर्थिक मंदीमुळे उत्पन्न शून्यावर आलं आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यावर मौन बाळगून आहेत.” अशी टीका प्रियंका गांधींनी केली आहे.

आपल्या आणखी एका ट्विटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधत प्रियंका म्हणाल्या, “सामान्य लोकांच्या समस्यांपासून इतक्या लांब असलेले पंतप्रधान असे भारताच्या इतिहासातील पहिलेच पंतप्रधान असावेत.”

नागरिकत्व सुधारणा विधेयकानुसार, पाकिस्तान, बांग्लादेश आणि अफगाणिस्तानातून भारतात आलेल्या बिगर मुस्लिम निर्वासितांना भारतीय नागरिकत्व दिले जाणार आहे. अशा या नागरिकत्व सुधारणा विधेयकाला ईशान्येकडील राज्यांत मात्र जोरदार विरोध होताना दिसत आहे. यावरून विरोधी पक्षांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/