‘संविधाना’ची भाषा बोलणार्‍या प्रियंका गांधींकडून वाहतूकीचे ‘नियम’ धाब्यावर, हेल्मेट न घालता स्कुटीवरून प्रवास (व्हिडिओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – शनिवारी संध्याकाळी उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये कॉंग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा यांनी ट्रॅफिकचे नियम न पाळता स्कूटीची राइड केली.

प्रियंका गांधी शनिवारी लखनऊ दौऱ्यावर होत्या. या दरम्यान संध्याकाळी प्रियंका गांधी दंगल भडकवण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या निवृत्त आयपीएस एसआर दारापुरीच्या कुटुंबाला भेटण्यासाठी लखनऊला जात होत्या, तरीही पोलिसांनी प्रियंका गांधींना कलम १४४ लागू असल्याने काफिलेबरोबर जाण्यास थांबवले होते, त्यानंतर प्रियंका गांधी या स्कूटी चालवून तिथे गेल्या.

https://twitter.com/Being_Vinita/status/1211117437980012544

पण ज्या स्कूटीवर प्रियंका गांधी बसल्या होत्या, त्या स्कूटीच्या ड्रायव्हरने हेल्मेट घातले नव्हते आणि प्रियांका गांधी यांनीदेखील हेल्मेट परिधान केलेले नव्हते, असे असूनही, प्रियांकाचे चलन कापले गेले नाही, तर नवीन वाहन कायद्यांतर्गत हेल्मेट न घालणाऱ्यास १ हजार ते १५०० रुपये पर्यंत दंड आहे, जर एखादा सामान्य व्यक्ती हेल्मेट न घालता गाडी चालवत असेल तर वाहतूक पोलिस त्याला ताबडतोब थांबवून दंड भरून घेतात, परंतु प्रियंका गांधींबरोबर असे झाले नाही. यामुळे लखनऊ पोलिसांवर गंभीर प्रश्न उपस्थित होतात की कायदा जेव्हा सर्वांसाठी समान आहे, तेव्हा प्रियंका गांधींचे चलन का कापले गेले नाही ?

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/