प्रियांका गांधी-वाड्रा यांनी मुदतीपुर्वीच सोडला सरकारी बंगला

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन – मुदती अगोदरच काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी-वाड्रा यांनी गुरुवारी दिल्लीतील सरकारी बंगला सोडला आहे. त्यांना केंद्र सरकारने 1 ऑगस्टपर्यंत सरकारी बंगला रिकामा करण्याची नोटीस 1 जुलै रोजी दिली होती. त्यानुसार प्रियंका गांधी-वाड्रा यांनी लोधी इस्टेट बंगला केंद्र सरकारकडून सरकारी बंगला खालीची नोटीस दिली होती.

काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या कन्या, काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी काही दिवस गुरुग्राममधील पेंटहाऊसमध्ये राहणार आहेत. त्यानंतर त्या आपल्या मध्य दिल्लीतील नव्या घरी जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिलीय.

गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने जुलै महिन्यात प्रियांका गांधी यांना लोधी इस्टेटमधील बंगला 35 खाली करण्याचे निर्देश दिले होते. या ठिकाणी 1997 पासून प्रियांका गांधी राहत होत्या. त्यांची सुरक्षाही काढून घेतली असून त्यांना झेड पल्स सुरक्षा असणार आहे. यापूर्वी त्यांना एसपीजी सुरक्षा दिली होती.

याबाबत काँग्रेस पक्षाकडून केंद्र सरकारच्या निर्णयावर टीका होत आहे. प्रियांक गांधी उत्तर प्रदेशमधील योगी सरकारला सतत टीका करत होत्या.त्यामुळे त्यांचा आवाज दाबण्यासाठी हे सरकारने त्यांना सरकारी बंगला खाली करण्यास सांगितला, असा आरोप काँग्रेसकडून केला जात आहे.

भाजपच्या नेत्या हरदीप सिंग पूरी यांनी काही दिवसांपूर्वी ट्विट करत प्रियांका गांधी यांनी त्यांना फोन केला होता, असे म्हटलं होतं. गांधी यांनी बंगला खाली करण्यासाठी आणखी वेळ मागितलाय. मात्र, प्रियांका गांधी यांनी हा दावा फेटाळून लावला होता. मी कोणालाही फोन केला नाही. तसेच 1 ऑगस्टपूर्वी बंगला खाली करणार आहे, असे त्या म्हणाल्या होत्या.

भाजप खासदार अनील बलूनी यांना हा बंगला दिला आहे. प्रियांका गांधी यांनी बलूनी यांना काही दिवसांपूर्वी चहासाठी घरी बोलावले होतं. बलूनी यांनीही प्रियांका यांना परिवारासह त्यांच्या उत्तराखंडमधील घरी भोजनासाठी येण्याचे आमंत्रण दिले आहे.