फाटक्या जीन्सला प्रियंका गांधींचे उत्तर; ‘हाफ चड्डीतील मोदींचा फोटो केला शेअर’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदाची तिरथसिंह रावत यांनी जबाबदारी स्विकारताच नव्या वादाला सुरुवात झाली आहे. मंगळवारी बाल अधिकार संरक्षण आयोगाच्या एका कार्यशाळेचे उदघाटन करताना रावत यांनी महिलांनी फाटलेली जिन्स घालणं म्हणजे संस्कार नाही, असे म्हंटले. यामुळे नव्या वादाला सुरुवात झाली आहे. महिलांच्या कपड्यांविषयी केलेल्या वक्तव्यावरून अनेकानी संताप व्यक्त केला आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधीनीही रावत यांच्यावर टीका केली असून त्यांनी ट्विटरवर पंतप्रधान नरेंद्र मोदींसह दिग्गज नेत्यांचा आरएसएसच्या पोशाखातील फोटो शेअर करत रावत यांच्यावर टीका केली आहे.

कार्यक्रमात रावत यांनी आजकाल फाटलेली जिन्स घालून महिला फिरताना दिसतात. हे सगळं बरोबर आहे का? हे संस्कार आहेत का? लहानांना लागणारे संस्कार हे मोठ्यांकडून येत असतात, असे म्हटले. त्यांच्या या विधानामुळे सोशल मीडियावर त्यांना चंगळ ट्रोल करण्यात आलं आहे. अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली हिनेही रावत यांना सडेतोड उत्तर दिल पण त्याच बरोबर मुख्यमंत्र्यांनाच आपली मानसिकता बदलण्याचा सल्ला दिला आहे.

तर दुसरीकडे काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी आपल्या फेसबुक आणि ट्विटर अकाऊंटवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सरसंघचालक मोहन भागवत, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आदी दिग्गज नेत्यांचा आरएसएसच्या जुन्या पोशाखातील फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये, या सर्वच नेत्यांनी खाकी हाफ चड्डी परिधान केली आहे. या फोटोला प्रियंका यांनी कॅप्शनही दिले आहे. ‘अरे देवा… यांचे गुडघे दिसत आहेत की…’, असे त्यामु म्हंटले आहे.

काय म्हणाली अमिताभची नात
रावत यांच्या विधानाला उत्तर देताना नव्याने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केला आहे. त्यामध्ये तिने रावत यांना सुनावले असून सल्लाही दिला आहे. आमचे कपडे बदलण्याआधी स्वतःची मानसिकता बदला. समाजात कशाप्रकारचा संदेश दिला जात आहे, ही बाब चिंताजनक आहे, यामुळे नव्या वादाला सुरुवात झाली आहे. एवढेच नव्या थांबली नाही तर तिने स्वतःचा गुडघ्यावर फाटलेल्या जीन्समधील फोटोदेखील पोस्ट केला आणि त्याखाली म्हंटले की मी माझी फाटलेली जीन्स घालेल. खूप गर्वानं घालेल. धन्यवाद. सध्या हि पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.