लोकसभा निवडणूकीनंतर ‘अपसेट’ झालेल्या प्रियंका गांधींनी पराभवाच ‘खापर’ कार्यकर्त्यांवर ‘फोडलं’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात उलथापालथ पाहायला मिळत आहे. अनेक राज्यात सुरु असलेला अंतर्गत कलह त्याचप्रमाणे राहुल गांधी आपल्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्यावर ठाम असल्याने देखील कार्यकर्त्यांत संभ्रमाचे वातावरण आहे. या सगळ्यात अमेठीमध्ये भाजपच्या स्मृती इराणी यांनी राहुल गांधींचा पराभव केल्याने काँग्रेससाठी हा देखील एका मोठा धक्का होता. त्यानंतर उत्तरप्रदेशच्या प्रभारी असलेल्या प्रियांका गांधी यांनी आपली नाराजी जाहीरपणे प्रकट केली होती.

त्यानंतर आता त्या उत्तर प्रदेशमध्ये जाऊन याबाबतचा आढावा घेत आहेत. उत्तर प्रदेशातील रायबरेली येथे पराभवाबाबत त्यांनी जाहीर नाराजी प्रकट करत या पराभवाचे खापर कार्यकर्त्यांवर फोडले. त्याचबरोबर यावेळी त्यांनी पराभव झटकून टाकत कामाला लागा असं आवाहन देखील कार्यकर्त्यांना केलं. त्याचबरोबर ऊत्तर प्रदेशमध्ये २०२२ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आदेश देखील यावेळी प्रियांका गांधी यांनी दिले. पुढे बोलताना त्या सोनिया गांधी यांच्या विजयाविषयी बोलताना त्या म्हणाल्या कि, सोनिया गांधी यांचा विजय हा कार्यकर्त्यांचा नसून जनतेचा आहे. निवडणुका या संघटनेवर जिंकल्या जातात. त्यामुळे स्थानिक पातळीवर संघटन मजबूत करण्याचा सल्ला देखील त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.

दरम्यान, २०२२ मध्ये होणारी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा देखील त्यांनी दिली. सपा – बसपा या आघाडीच्या अपयशानंतर आता त्यांनी कार्यकर्त्यांना या निवडणुकीसाठी तयारी सुरु करण्याचे आदेश त्यांनी कार्यकर्त्याना दिले.

आरोग्यविषयक वृत्त (www.arogyanama.com)

हळदीचे ‘हे’ दोन फेसपॅक वापरून तुम्ही दिसाल तजेलदार

तांब्याची बॉटल खरेदी करताना घ्या ही काळजी

मेकअप रिमूव्ह करुन झोपा नाहीतर त्वचेला होईल नुकसान

हाताला ६ बोटे असणे असते फायद्याचे