VIDEO : काश्मीर बद्दल प्रियंका गांधींनी शेअर केला ‘व्हिडीओ’, ‘हे’ तर राष्ट्र विरोधापेक्षा देखील ‘भयानक’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – काश्मीर मधील एक व्हिडीओ शेअर करत प्रियंका गांधी म्हणाल्या कि, काश्मीर मध्ये लोकशाही अधिकारांवर बंधने लादली जाणे हि, बाब राजकीय तर आहेच परंतु, देशद्रोहापेक्षा मोठी आहे. त्यांच्यावर राजकारणाचे आरोप लावणाऱ्यांविरोधात काँग्रेसच्या प्रियंका गांधी यांनी काश्मीर मध्ये लोकशाही अधिकारांवर बंधने आणले जाणे हि, बाब देशद्रोहापेक्षा मोठी असल्याचे सांगितले. त्या म्हणाल्या कि, कॉंग्रेस याच्या विरोधात आवाज उठवणे बंद करणार नाही.

गांधी यांचे हे वक्तव्य, विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळाच्या दुसऱ्या दिवशी आले आहे. हे शिष्टमंडळ काश्मीर मध्ये जाऊन कलम ३७० हटवल्यानंतर काश्मीर मधील परिस्थितीचा आढावा घेणार होते परंतु, त्यांना श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून परत यावे लागले होते.

ट्विटर वर प्रियंका गांधी यांनी एक व्हिडीओ प्रसारित केला. ज्यामध्ये एक महिला आपल्या परिवाराला अनेक समस्यांना कशा प्रकारे सामोरे जावे लागत आहे. हे दिसून येत आहे. ‘हे आणखी किती काळ चालणार आहे .. ? असा प्रश्नही विचारला. राष्ट्रवादाच्या नावाखाली सर्व काही दाबलं जात आहे. सर्वांना गप्प बसवले जात आहे असे त्या म्हणाल्या.

आरोग्यविषयक वृत्त –

 

You might also like