UP : सोनभद्रकडे निघालेल्या प्रियंका गांधी यांना पोलिसांनी घेतल ताब्यात

वृत्‍तसंस्था : जमीनीच्या वादातून झालेल्या भांडणांमध्ये 9 जणांचा मृत्यू झाल्याची घटना उत्‍तरप्रदेशातील सोनभद्र जिल्ह्यात घडली होती. त्यापार्श्‍वभुमीवर काँग्रेसच्या प्रियंका गांधी मृतांच्या कुटूंबियांना भेटण्यासाठी जात असतानाच त्यांना आडवण्यात आले. त्यानंतर प्रियंका गांधींनी तेथेच धरणे आंदोलन चालु केले. दरम्यान, आता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.


दोन दिवसांपुर्वी सोनभद्र जिल्ह्यातील एका गावात दोन गटांमध्ये जमीनीच्या वादातून भांडणे झाली होती. सरपंच आणि गावकर्‍यांमधील वाद विकोपाला गेला आणि सरपंचाच्या गटाकडून गोळीबार करण्यात आला. त्यामध्ये 5 पुरूषांसह 4 महिलांचा मृत्यू झाला. परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. तेव्हापासुन उत्‍तरप्रदेशातील राजकीय वातावरण तापले आहे. आज (शुक्रवार) प्रिंयका गांधी मृतांच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी रवाना झाल्या. त्यांच्या गाड्यांचा ताफा पोलिसांकडून अडवण्यात आला. त्यानंतर प्रियंका गांधींनी तेथेच धरणे आंदोलन सुरू केले. मात्र, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. सध्या सोनभद्रमध्ये कलम 144 लागू आहे. त्यापार्श्‍वभुमीवर प्रियंका गांधी यांना ताब्यात घेण्यात आले आहे.