23 वर्षांपूर्वी प्रियंका गांधींना लोधी इस्टेटमध्ये देण्यात आला होता बंगला, जाणून घ्या’रेंट’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : कोरोना व्हायरसच्या संकट काळात आणि सीमेवर चीनशी सुरू असलेल्या संघर्ष दरम्यान भारतीय जनता पार्टी आणि कॉंग्रेस यांच्यातील राजकीय लढाई तीव्र झाली आहे. केंद्रीय नगरविकास मंत्रालयाच्या वतीने कॉंग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा यांना दिल्लीच्या लोधी इस्टेटमधील सरकारी बंगला सोडण्याची नोटीस मिळाली आहे. 1 ऑगस्टपर्यंत प्रियंकाला हे रिकामे करावे लागेल. दरम्यान, कॉंग्रेसने याला स्वत: वर हल्ला असल्याचे म्हटले आहे.

का पाठविली गेली नोटीस?
दरम्यान, गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये केंद्रीय गृह मंत्रालयाने देशातील एसपीजी सुरक्षेचा आढावा घेतला. यानंतर गांधी कुटुंब म्हणजेच सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याकडून एसपीजी कव्हर मागे घेण्यात आले. आता या तिघांजवळ झेड प्लस सुरक्षा आहे, तीही सीआरपीएफ सोबत. याच संरक्षणा अंतर्गत लोधी इस्टेटमध्ये प्रियंका गांधींना सरकारी बंगला अलॉट होता, आता केंद्रीय नगरविकास मंत्रालयाचे म्हणणे आहे की, संरक्षण नाही म्हणून तुम्हाला 1 ऑगस्टपर्यंत बंगला रिकामा करावा लागेल. असे न केल्यास अतिरिक्त भाडे भरावे लागेल.

कधी मिळाला होता प्रियांकाला बंगला?
वृत्तसंस्था पीटीआयच्या म्हणण्यानुसार, प्रियंका गांधी वाड्रा यांना 21 फेब्रुवारी 1997 रोजी लोधी रोडवर बंगला देण्यात आला होता. तेव्हा त्यांच्याजवळ SPG सुरक्षा होती. परंतु झेड प्लस सुरक्षेत बंगला मिळत नाही. एजन्सीनुसार प्रियंका गांधी या बंगल्यासाठी दरमहा 37 हजार रुपये भाडे देत होत्या. एका अधिकाऱ्याने सांगितले की, 2000 मध्ये असा नियम बनविण्यात आला होता की ज्याच्याकडे एसपीजी सुरक्षा नसेल त्याला कोणत्याही प्रकारचा सरकारी बंगला दिला जाणार नाही. या श्रेणीतील बंगल्यांना बाजारभावापेक्षा 50 टक्के अधिक भाडे दिले जाईल, असे पूर्वी ठरविण्यात आले होते, परंतु नंतर ते कमी करून 30 टक्के करण्यात आले.

दरम्यान, कॉंग्रेस पक्षाच्या वतीने या निर्णयाला प्रतिशोधाची कारवाई असल्याचे म्हंटले गेले आहे. रणदीप सुरजेवाला यांचे म्हणणे आहे की, प्रियंका गांधी वाड्रा सतत केंद्र सरकार आणि उत्तर प्रदेश सरकारला लक्ष्य करीत आहेत, म्हणूनच मोदी सरकारने या बदल्यात हा निर्णय घेतला आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनीही हा निर्णय मागे घेण्यास सांगितले आहे. दुसरीकडे, आता प्रियांका गांधी वाड्रा यांना लखनऊमध्ये हलवले जाण्याची शक्यता आहे. कारण पुढे 2022 मध्ये उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका आहेत. अशा परिस्थितीत कॉंग्रेस आधीच त्याची तयारी करत आहे.