क्रिकेटचा Video शेअर करत प्रियंका गांधी यांनी मारला राजकीय ‘सिक्सर’, मोदी सरकारवर ‘घणाघात’ (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कॉंग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी-वाड्रा यांनी पुन्हा एका देशाच्या अर्थव्यवस्थेच्या स्थितीवरुन मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. प्रियंका गांधी यांनी शुक्रवारी सय्यद मुश्ताक ट्रॉफीचा एक व्हिडिओ शेअर केला. ज्यात एक शानदार कॅचसाठी खेळाडू उडी मारताना दिसत होता. याच व्हिडिओबरोबर प्रियंका गांधी यांनी सांगितले की, भारतीय अर्थव्यवस्थेसाठी जनहितार्थ. प्रियंका गांधी यांनी ट्विट केले की, चांगला कॅच पकडण्यासाठी शेवटपर्यंत नजर आणि खेळाप्रती खरी भावना हवी. अन्यथा तुमचा सर्व दोष ग्रॅव्हिटी, गणित, ओला-उबर आणि बाकी गोष्टींना देत असतो.

प्रियंका गांधी यांनी ट्विटमध्ये शेवटी लिहिले की, सय्यद मुश्ताक ट्रॉफीचा एक व्हिडिओ शेअर केला ज्यात एक शानदार कॅचसाठी खेळाडू उडी मारताना दिसत होता. याच व्हिडिओबरोबर प्रियंका गांधी यांनी सांगितले की, भारतीय अर्थव्यवस्थेच्या जनहितार्थ.

भाजप मंत्र्यांने केले होते वक्तव्य –
केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन नुकतीच काही वक्तव्य केली होती. पीयुष गोयल म्हणाले होते की, अर्थव्यवस्था सांभाळण्यासाठी कोणत्याही गणिताची किंवा त्याच्याशी संबंधित आकडे पाहण्याची गरज नाही, जर आइंस्टाईन या गणितात अडकून राहिले असते तर गुरुत्वाकर्षणाचा शोध करु शकले नसते. तर निर्मला सीतारामन म्हणाल्या होत्या की, अर्थव्यवस्थेच्या स्थितीसाठी ऑटो क्षेत्रातील दुरावस्थेसाठी ओला उबर जबाबदार आहे. यावर प्रियंका गांधी यांनी टीका केली.

योगी सरकारवर देखील टीका –
योगी सरकारवर देखील प्रियंका गांधी टीका करत आहेत. त्यांनी योगी सरकारवर पत्रकारावर झालेल्या हल्लावरुन निशाणा साधला. प्रियंका गांधींनी शेअर केलेला व्हिडिओ मार्च मधील आहे, यात महाराष्ट्र आणि रेल्वेबरोबर झालेल्या मॅचमध्ये ऋतुराज गायकवाड यांनी शानदार कॅच घेतला होता.