#VideoViral : देवीच्या दर्शनाला गेल्या प्रियंका गांधी ; उपस्थितांनी केला मोदींचा जयघोष

मिर्झापूर : वृत्तसंस्था – आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीकोनातून काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी दौऱ्यांचा सपाटा लावला आहे. त्यांच्याकडे पक्षाने उत्तर प्रदेशच्या पूर्व भागाची जबाबदारी दिली आहे. प्रियंका गांधी यांनी आज उत्तर प्रदेशच्या मिर्झापूरमधील विंध्यवासिनी मंदिरात जाऊन देवीचं दर्शन घेतलं. यावेळी काहींनी मोदी-मोदी असे म्हणत मोदींच्या नावाने घोषणाबाजी केली.

प्रियंका गांधी यांनी बोट यात्रेला सुरुवात केली असून आज त्यांच्या बोट यात्रेचा दुसरा दिवस आहे. या दौऱ्यादरम्यान त्यांनी ख्वाजा इस्माइल चिश्ती दर्ग्याला भेट दिली. यानंतर प्रियंका यांनी विंध्यवासिनी मंदिरात दर्शनासाठी पोहोचल्या. यानंतर त्यांनी मंदिरात येऊन देवीचं दर्शन घेतलं आणि पूजाही केली. यावेळी प्रियंका गांधींसमोर लोकांनी मोदी-मोदी अशी घोषणाबाजीही केली. काही लोक मंदिराच्या बाहेर उभे होते. त्यातील काहींनी तर हर हर मोदी, घर घर मोदी अशा घोषणाही दिल्याचे दिसून आले.

मिर्झापूर दौऱ्यादरम्यान प्रियंका गांधी यांनी राधे कृष्ण मंदिरालादेखील भेट दिली. याठिकाणी त्यांनी पूजाही केली. त्यानंतर प्रियंका यांनी नोंदवहीत जय माता दी असं लिहलं. यानंतर प्रियंका भटौलीमध्ये लोकांच्या भेटीगाठी घेणार आहेत. त्या सिंधौलमध्ये शेतकऱ्यांशी चर्चाही करणार आहेत. शिवाय त्या कार्यकर्त्यांसोबत संवादही साधणार आहेत.