प्रियंका गांधींना काँग्रेसला ‘यश’ मिळवून देण्यास आले अपयश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील लोकसभेच्या निवडणुका जिंकण्याच्या हेतूने काँग्रेसने पक्षामध्ये मोठे फेरबदल केले. राहुल गांधी यांची बहीण प्रियंका गांधी यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांना पूर्व उत्तर प्रदेशच्या सरचिटणीस पदाची सुत्रे देण्यात आली. प्रियंका गांधी यांची राजकारणात एन्ट्री झाल्याने भाजपाला धडकी भरली होती. त्यामुळे भाजपच्या अनेक नेत्यांनी प्रियंका गांधींवर टीका केली होती. काँग्रेसला प्रियंका गांधी यांच्याकडून भरपूर अपेक्षा होती. मात्र, राहुल गांधी यांना अमेठी मतदार संघात निवडून आणण्यात प्रियांका गांधी यांना अपयश आले आहे.

प्रियंका गांधी यांनी ज्या मतदारसंघांमध्ये प्रचारसभा घेतल्या त्या मतदारसंघामध्ये काँग्रेसला अपयश आले आहे. देशातील फक्त सोनिया गांधी यांचा रायबरेली मतदारसंघ आणि राहुल गांधी यांचा केरळ मधील वायनाड मतदारसंघात प्रियंका गांधींना काँग्रेसला यश मिळवून देता आले. पंजाबच्या ज्या मतदारसंघांमध्ये प्रियंका गांधी यांनी प्रचारसभा घेतल्या त्या दोन मतदारसंघांमध्येही काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला आहे.